Video: चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:47 PM2023-02-07T13:47:37+5:302023-02-07T13:50:16+5:30
राष्ट्रवादी नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम
पुणे : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवारी नाना काटे यांना मंगळवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याच ठरल्यावर राहुल कलाटे आणि नाना काटे यांची नावे चर्चेत होती. मंगळवारपर्यंत तिढा सुटत नव्हता. अखेर नाना काटे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कलाटे हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे हे अपक्ष अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन दिसून आले आहे. जवळपास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्याबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.
चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे इच्छुक होते. मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल कलाटे यांना डावलल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन दिसून आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फुटीची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राहुल कलाटे अपक्ष उमेदवारी अर्ज करण्यासाठी रवाना#Chinchwadpic.twitter.com/GFWkyXMtgv
— Lokmat (@lokmat) February 7, 2023
काय म्हणाले राहुल कलाटे
मला मागच्या वेळी १ लाखाहूनही अधिक माते मिळाली होती. २०१४, २०१९ ला मला असंख्य मते देऊन जनतेने माझ्यावरचा विश्वास दाखवला होता. मला त्याबाबत आत्मविश्वास होता. महाविकास आघडीकडे मी प्रमुख दावेदार होतो. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मागत होतो. परंतु काय झालं ते वरिष्ठचा सांगतील. लक्ष्मण जगताप यांच्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. परंतु आघाडीने निवडणूक लढवणार असल्याचे ठरवल्यावर मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली होती.