शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

Vidhan Sabha 2019 : पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमानांविरोधात आघाडी कोणाला उतरविणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:38 PM

पिंपरी-चिंचवड शहरात तीन आणि मावळात एक असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत....

ठळक मुद्देभाजपा आणि शिवसेनेने पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदार संघातील उमेदवार केले जाहीरविधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

पिंपरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा आणि शिवसेनेने पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदार संघातील उमेदवार जाहीर केले असून, भाजपाने विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदारांविरोधातकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कोणाला उतरविणार? याबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तीन आणि मावळात एक असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. भाजपा-शिवसेना महायुतीचा निर्णय झाल्यानंतर भाजपाच्या पहिल्या यादीत चिंचवडमधून शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीतून अपक्ष आमदार महेश लांडगे, पिंपरीतून शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, मावळमधून भाजपा उमेदवार जाहीर झाला नाही. पहिल्या यादीत राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नाव नाही. त्यामुळे भेगडे समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे.आघाडीकडून मोचेर्बांधणी सुरू शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या वतीने विद्यमान आमदारांना संधी दिल्याने यांच्याविरोधात दमदार उमेदवार उतरविण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने केली आहे. विरोधीपक्षांचे मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. आघाडीच्या यादीत कोणाची वर्णी लागणार यावर विधानसभेतील लढत निश्चित होणार आहे. भाजपा-शिवसेनेत जल्लोषउमेदवारी जाहीर झाल्याने आमदार जगताप, लांडगे, आणि चाबुकस्वार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. चिंचवडला पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी या भागात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. लांडगे यांच्या वतीने भोसरी परिसरात कार्यक्रम झाला. तर शिवसेनेच्या वतीने आकुडीर्तील कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठक घेतली. आमदार जगताप गुरुवारी अर्ज दाखल करणार असून, आमदार लांडगे शुक्रवारी तर आमदार चाबुकस्वार हे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. मावळचा तिढा सुटेनामावळमध्ये बाळा भेगडे हे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री आहेत. पहिल्या यादीत भेगडे यांचे नाव नसल्याने समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. पहिल्या यादीत नाव का नाही? याबाबत तर्क आणि विर्तक लढविले जात आहेत. मावळमध्ये अद्यापपर्यंतचा इतिहास पाहता प्रत्येकाला एकदाच संधी मिळाली आहे. त्यामुळे यादीत नाव नसल्याने भेगडे समर्थकांची धाकधूक वाढली आहे. बंडखोरी रोखण्याचे आव्हानयुती आणि आघाडी फिस्कटण्याची वाट अनेक इच्छुक पाहत होते़ मात्र, युती आणि आघाडी झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारांची संख्या अधिक होती. गेल्या दोन महिन्यांपासून पोस्टरबाजी सुरू होती. इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी पडले आहे. पिंपरी आणि भोसरीतील इच्छुक कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले असून, बंडखोरी रोखण्याचे आव्हान प्रमुख पक्षांसमोर आले. चिंचवड आणि मावळमधील इच्छुकांची नाराजी दूर करावी लागणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMLAआमदारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस