पिंपरी : तृतीय पंथीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीतर्फे तृतीयपंथी उमेदवारास निवडणूक रिंगणात उतरविण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लागून आहे.जनहित लोकशाही पार्टीतर्फे पिंपरी येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हाट, उपाध्यक्ष संतोष चौधरी, प्रदेशाध्यक्ष डॉ. विनोद मोरे, उपाध्यक्ष मिलिंद साळवी, जनहित कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वास गजरमल, बाळासाहेब पाटोळे, जनहित तृतीय पंथी लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नितीश लोखंडे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुखे आदी या वेळी उपस्थित होते. नताशा लोखंडे असे या तृतीय पंथी उमेदवाराचे नाव आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या नताशा पदवीधर असून हॉटेल मॅनेजमेंट झालेले आहे. आपल्या उमेदवारीबाबत त्या म्हणाल्या, चिंचवड मतदारसंघात सुमारे सातशे तृतीय पंथी आहेत. मात्र यातील काही मोजक्याच जणांची नावे मतदार यादीत आहेत. ओळखपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आदी विविध कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात अडचणी येतात. तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. या समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे. तृतीयपंथीयांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे. मात्र यंत्रणा आणि समाज त्याबाबत उदासीन आहे. ही परिस्थिती बदलायची आहे. माज्या शिक्षणाचा फायदा मी या घटकासाठी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चिंचवड मतदारसंघात आयटीयन्स मोठ्या संख्येने आहेत. आयटी क्षेत्राशी माझा संपर्क असल्याने या मतदारांचा मला फायदा होणार आहे. त्यांच्या समस्या मला माहित आहेत. तसेच सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
Vidhan Sabha 2019 : चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:43 PM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : चिंचवड मतदारसंघात सुमारे सातशे तृतीयपंथी आहेत. मात्र, यातील काही मोजक्याच जणांची नावे मतदार यादीत आहेत.
ठळक मुद्देतृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात येतात अडचणी