शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

शेतकरी दिनानिमित्त शिवार भेट

By admin | Published: August 31, 2015 3:58 AM

मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने दुसरा शेतकरीदिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेतकरी दिनानिमित्त शिवार भेट, पिकांवरील

गहुंजे/कामशेत : मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने दुसरा शेतकरीदिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेतकरी दिनानिमित्त शिवार भेट, पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.गेल्या वर्षी झालेल्या शासन निर्णयानुसार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून २९ आॅगस्ट हा दिवस प्रतिवर्षी ह्यशेतकरी दिनह्ण म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मावळ कृषी विभागाकडून शेतकरीदिन साजरा करण्यात येत आहे. पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. नरेंद्र काशीद, तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबिरे व उपस्थित दोन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी बजाबा मालपोटे (रा. फळणे), तसेच भरत मांडेकर (रा. आंबी) यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना भातपिकावरील कीड व रोग नियंत्रित ठेवण्याबाबत वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्रातील प्रमुख डॉ. नरेंद्र काशीद यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘भातपिकाचे किडीपासून मोठे नुकसान होते. काही मोजक्या किडीपासून तीस टक्के घट होऊ शकते. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कीटकनाशके वापरावीत. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सल्ला घ्यावा.’’ कार्यक्रमाला शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)