पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाच्या वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पाचे काम जोरात सुरू आहे. शून्य तरतुदी, टोकन हेड गायब होणार असून, १५ फेब्रुवारीला आयुक्त श्रावण हर्डीकर अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करतील.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गतवर्षीचा अर्थसंकल्प चार हजार सातशे कोटींचा होता, तर जेएनएनयूआरएम व केंद्र शासनाच्या इतर योजनांसह एकूण पाच हजार शंभर कोटींचा होता. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आयुक्तांनी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर त्यावर चर्चा, बदल होऊन सर्वसाधारण सभेसमोर चर्चाही झाली होती. त्यानंतर विकासकामांच्या निविदा काढण्यास सुरुवात झाली होती.महापालिकेने आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी १० लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकशे एक जणांनी कामे सुचविली आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठाविषयक कामे आहेत. या कामांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश होणार आहे.आकार होणार लहानआगामी वर्षात शून्य तरतूद असलेले सर्व लेखाशीर्षक वगळले असून, जेवढ्या रकमेचे काम आहे. तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवावी, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे वाढीव, सुधारित खर्चाला आळा बसणार आहे. जेवढी कामे करायची तेवढ्याच कामांचा समावेश अर्थसंकल्पात करावा. अनावश्यक कामांचा करू नये.शून्य तरतूद अथवा टोकन हेडला प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे आहे त्याच कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर मांडणाºया अर्थसंकल्पात नवीन संकल्पना असतील. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचा आकारही लहान होणार आहे. अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंधरा फेब्रुवारीला आयुक्त स्थायी समितीसमोदर अर्थसंकल्प सादर करणार आहेत.२४ जानेवारीला नवीन सदस्यांना संधीभारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिला सभापती होण्याचा मान सीमा सावळे यांना मिळाला. स्थायी समितीतील सोळापैकी आठ सदस्यांची मुदत फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांसाठी २४ जानेवारीला ड्रॉ काढला जाणार आहे. यामध्ये कोणत्या नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागेल किंवा कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शून्य तरतूद होणार गायब; प्रशासनातर्फे १५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:11 AM