शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

विकासासाठी शिवसेनेला मत द्या

By admin | Published: February 16, 2017 3:09 AM

शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. नागरिकांच्या सहकार्याने थेरगाव परिसराचा विकास करण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून विकास साधला

पिंपरी : शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. नागरिकांच्या सहकार्याने थेरगाव परिसराचा विकास करण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून विकास साधला आहे. या परिसराचा आणखी विकास करण्यासाठी नागरिकांनी शिवसेनेला मतदान करावे, विकासाला मत म्हणजेच शिवसेनेला मत आहे, असे मत खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी व्यक्त केले.शिवसेनेच्या वतीने थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून आज पदयात्रा आणि गाठीभेटींवर भर देण्यात आला. या वेळी उमेदवार शालिनी कांतीलाल गुजर, नीलेश बारणे, सचिन भोसले, दीपाली गुजर सहभागी झाले होते. पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत सहभागी होऊन खासदार बारणे यांनी मतदारांना आवाहन केले. ‘खिच के तान धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या फेरीत मोठ्या प्रमाणावर तरुण महिला सहभागी झाल्या होत्या.खासदार बारणे म्हणाले, ‘‘थेरगाव परिसराचा नियोजनबद्ध विकास सुरू आहे. या विकासाला गती देण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेची शक्ती वाढविण्याची गरज आहे. शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाहीत, तर ती आश्वासने पाळतो. अनधिकृत बांधकामे असो किंवा शास्तीकर असो, जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आग्रही राहिलेली आहे. आंदोलने केली आहेत. प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे विकासासाठी शिवसेनेला साथ द्या.’’प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर म्हणाले, ‘‘मावळचे खासदार अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव परिसराचा विकास झाला आहे. मी शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. समाजकारण आणि राजकारण अशा क्षेत्रात आमचे कुटुंब कार्यरत आहे. परिसराच्या विकासासाठी शिवसेनेला साथ द्यायला हवी. सर्व उमेदवारांना विजयी करून शिवसेनेची महापालिकेतील ताकत वाढवायला हवी.’’ (प्रतिनिधी)