शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

कॅन्टोन्मेंटमध्ये घटले मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:44 AM

२०१८ची अंतिम मतदारयादी झाली प्रसिद्ध; सात वॉर्डांत ३२ हजार ४२५ मतदार

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१८ ची अंतिम मतदारयादी शनिवारी (दि. १५) प्रसिद्ध करण्यात आली. कॅन्टोन्मेंटच्या सात वॉर्डांत ३२ हजार ४२५ मतदार असून, वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वाधिक ६ हजार ५७४ मतदार आहेत. तर वॉर्ड क्रमांक सातमध्ये सर्वांत कमी ३ हजार १८५ मतदार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदार संख्या ३ हजार ६१२ ने घटली आहे. नागरिकांना मतदारयादी पाहण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सांगितले.कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा २००७ च्या कलम दहा अन्वये देशातील सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डात दरवर्षी मतदारयादी तयार करण्यात येते. त्यानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंटने १९ एप्रिल २०१७ पासून हद्दीतील सात प्रभागांतील मतदारयादी तयार करणेसाठी शिक्षक प्रगणकांची नेमणूक केली होती. या प्रगणकांनी मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष जाऊन कॅन्टोन्मेंट निवडणूक नियमानुसार बोर्डाने दिलेला ठराविक नमुन्यातील अर्ज प्रत्येक कुटुंब प्रमुखांकडून सहीनिशी भरून घेण्यात आला होता. १ मार्च २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण असणाऱ्या व बोर्ड हद्दीत राहणाºयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादी बनविताना व्यक्तीचे नाव, वय, पूर्ण पत्ता, (घर क्रमांकासह), अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती याबाबत माहिती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.कॅन्टोन्मेंट निवडणूक कायद्यातील तरतुदीनुसार एक जुलैला प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली होती. या यादीतील नाव, पत्ता व वयात दुरुस्ती करणे, नवीन नावे समाविष्ट करणे, यादीतील नावांवर हरकती घेणे, दावे दाखल करणेसाठी नागरिकांना वीस जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट नियम १७ अन्वये शनिवारी १५ सप्टेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, १६ हजार ७१६ पुरुष मतदार असून, १५ हजार ७०९ स्त्री मतदार आहेत. मतदारयादी मराठी व इंग्रजी भाषेत बनविण्यात आली आहे.गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत सात वॉर्डांत एकूण मतदार संख्या ३६ हजार ३७ इतकी होती. यात १८ हजार ७२८ पुरुष मतदार व १७ हजार ३०९ स्त्री मतदार होते. मात्र, शनिवारी झालेल्या मतदारयादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार १२ पुरुष मतदार व एक हजार ६०० स्त्री मतदार असे एकूण ३ हजार ६१२ मतदार कमी झाले आहेत. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असताना मतदार संख्या वाढण्याऐवजी अचानक एवढे मतदार कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड