शहरं
Join us  
Trending Stories
1
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
2
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
3
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
4
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
5
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
6
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
7
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
8
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
9
सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय?
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
11
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
12
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
13
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
14
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
15
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
16
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
18
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
19
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
20
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

वाकड पोलिसांची कामगिरी लाखात भारी;  २० लाखांचे १२० मोबाइल नागरिकांना परत 

By नारायण बडगुजर | Updated: December 21, 2024 19:59 IST

विशेष पथकाने ट्रेस केले हरवलेले, गहाळ, चोरी झालेले मोबाईल फोन  

पिंपरी : मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ होताच संबधित व्यक्‍ती पोलिस ठाण्यात धाव घेतात. अशा गहाळ, चोरी झालेल्या मोबाईल फोनचा राज्यातून तसेच परराज्यातून वाकड पोलिसांनी शोध घेतला. असे २० लाखांचे १२० मोबाइल फोन नागरिकांना परत मिळवून दिले. त्यामुळे संबंधित नागरिकांचे चेहरे आनंदाने खुलले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. 

वाकड पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २१) नागरिकांना मुद्देमाल परत देण्यात आला. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतून मोबाईल फोन चोरी, हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवून अशा फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मागदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी पोलिस अंमलदार शहाजी धायगुडे, कोंतेय खराडे, प्रमोद गायके यांचे विशेष पथक स्थापन केले. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) या पोर्टलव्दारे चोरी, हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल फोन या विशेष पथकाने ट्रेस केले. परराज्यातून आणले मोबाईल हरवलेले, गहाळ व चोरी झालेले मोबाईल हे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील वेगवेगळे जिल्हे तसेच बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंधप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे ट्रेस झाले. संबंधित मोबाईल ज्या व्यक्तींच्या ताब्यात आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मोबाईल परत करण्याबाबत सांगितले. प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून मोबाईल परत मागविले. काही मोबाईल पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन हस्तगत केले.  

मागील दोन महिन्यांमध्ये वाकड पोलिस ठाण्याकडून २० लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल हस्तगत करण्यात आले. यापुढेही अशीच मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ, चोरी झालेले मोबाईल परत करण्याची कार्यवाही चालू राहील. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेwakadवाकड