नारायण बडगुजर-पिंपरी : सिग्नल जंपिंग, झेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबवणे, नो एण्ट्रीतून वाहन नेणे अशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे महागात पडत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. महिन्याभरात १८२५ बेशिस्त वाहनचालकांना पाच लाख ६९ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ‘सेफ सिटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार शहरातील मुख्य चाैक, रस्ते आदी ठिकाणी अद्ययावत तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका, पोलिसांची वाहतूक शाखा यांचा या उपक्रमात सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे.
शहरात ठिकठिकाणी ३०० सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहेत. यात ३३ ‘पॅन टील्ट झूम’ २४ ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशन (एएनपीआर) अर्थात वाहन क्रमांक तपासणी करणारे कॅमेरे तसेच २४३ फिक्स्ड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. वाहतूक शाखेच्या चिंचवड येथील नियंत्रण कक्षाशी या कॅमेऱ्यांना कनेक्ट करण्यात आले आहे. चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीवर ‘वाॅच’ ठेवला जात आहे.
सीसीटीव्ही कक्षातील पोलीस कर्मचारी हे स्क्रीनवरील कॅमेऱ्यावर लक्ष ठेवून असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांबाबत संबंधित पाॅईंटवरील पोलीस कर्मचाऱ्याला वायरलेसव्दारे संदेश दिला जातो. त्यानुसार संबंधित कर्मचारी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतात. तसेच कारवाईबाबत सीसीटीव्ही कक्षाला माहिती देतात.
...या कारणास्तव होते कारवाईराॅंग साईडझेब्रा क्राॅसिंगसिग्नल जंपिंगडबल पार्किंगनो एण्ट्रीनो पार्किंगट्रिपल सिटविनामास्क
वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कक्षातून नोव्हेंबरमध्ये झालेली कारवाईदेण्यात आलेले काॅल : ४०२केलेल्या केसेस : १८२५आकारलेला दंड : ५ लाख ६९ हजार रुपये
कारवाई वाढल्याने झालेले बदल - सिग्नलला झेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविण्याचे प्रमाण कमी झाले- सिग्नल जंपिंगचे प्रकार घटले- वाहने व्यवस्थित पार्किंग करण्याला प्राधान्य- विरुध्द दिशेने वाहने चालविण्याचे प्रमाण घटले- वाहनचालविताना मास्कचा वापर वाढला- प्रतिबंध केल्याने सिग्नलवरील वस्तू विक्रेते व भिकाऱ्यांचे प्रमाण झाले कमी
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. यातून प्रदूषण तसेच अपघात कमी होण्यास मदत होईल. - श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड