लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आळंदी आणि परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी केली होती. पाणीपुरवठ्याविषयी आयक्त श्रावण हर्डीकर यांनी आळंदीला पाणी देणार असल्याचे जाहीर केले होते. ‘आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार आहे. त्यावर महापौर काळजे यांनी आज प्रशासनास सोमवारपासून पाणी द्यावे, अशा सूचना पाणीपुरवठा विभागास केल्या आहेत.
पालिकेकडून आळंदीला सोमवारपासून पाणी
By admin | Published: May 13, 2017 4:42 AM