लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. गेल्या आठवडाभरपासून ही कपात सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पवना धरणातील साठा ३० टक्क्यांवर आल्यानंतर महाराष्ट्र दिनापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीसाठा कमी झाला. लोकसंख्या व पाणीउपसा लक्षात घेऊन प्रत्यक्ष पाऊस होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे महापौरांनी गटनेते, पक्षनेते आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाणी कपातीचे धोरण स्वीकारले. महापौरांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार दोन मे पासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. परंतु, अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होता आहे. चिखली, मोशी, चऱ्होली यासमाविष्ट गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. टँकर उभे असतात.
पाणीकपात मागे घेणार नाही
By admin | Published: May 09, 2017 3:52 AM