शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Published: March 23, 2017 4:19 AM

सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.

तळेगाव दाभाडे : सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.मावळ तालुक्यातील वडगाव, माळवाडी, कोटेश्वर वाडी, इंदोरी, जांबवडे, सुदुंबरे, खालुंब्रे आदी भागामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी कांद्याच्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीची जखम ताजी असताना चालू वर्षीसुद्धा हा बाजारभाव शेतकऱ्यांचे ‘पानिपत’ करत आहे. चालू वर्षीही भाव नाही. साठवायचा तर, गतवर्षी सडलेल्या, उकिरड्यावर फेकलेल्या कांद्याचा वास अद्यापही गेलेला नाही. गतवर्षी कांद्याने शेतकऱ्यांची मोठी दैना केली. उत्पादन भरपूर निघाले पण बाजार ‘डाऊन.’ सोन्यासारखा माल कवडीमोल भावाने विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. बहुतांश शेतकऱ्यांनी ह्यया बाजारभावात कांदा विकूनही साधी मजुरीही भागात नाहीह्ण म्हणून कांदा साठवणे पसंत केले. त्यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीचा कटू अनुभव असल्याने यावर्षी कांदा ठेवण्याचा कोणताच शेतकरी विचार करत नाही. पुणे, नगर या ठिकाणी बाजारभाव नाहीत. दोन पैसे जरा बऱ्यापैकी मिळतील या आशेने येथील शेतकरी सोलापूर, कोल्हापूर अशा लांबच्या बाजारपेठा गाठत आहे. मात्र ‘सब घोडे बारा टक्के’ असाच अनुभव त्याला सर्वत्र येत आहे. उलट वाहतूक खर्च वाढतो व अधिक तोटा होतो. मात्र हा तोटा सहन करून शेतकरी कांदा मात्र घरी न ठेवता विक्रीसाठीच पाठवत आहे. (वार्ताहर)शेतीविरोधी धोरणाने कांदा उत्पादक हतबल-पिंपरी : जिल्ह्यात कांदा व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असलेल्या मावळ तालुक्यातील शेतकरी वर्ग राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे आर्थिक हतबल झाला आहे. ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ दूर नसल्याची भीती शेतकरीवर्गात पसरली आहे.गेली दोन वर्षे शेतकरीवर्ग नगदी पीक कांदा तसेच टॉमेटो व भाजीपाला वर्गातील पिकांचे उत्पादन करण्यासाठी बँका तसेच सोसायटीतून कर्जे उचलून त्यासाठी खर्च केले आहेत. तयार झालेला माल कवडीमोलाने बाजारात विकला गेल्यामुळे या पिकांचा भांडवली खर्चदेखील वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची सध्या ‘आई भीक मागू देत नाही, बाप पोट भरून देत नाही’ अशी अवस्था झाली आहे.शेती सोडून शेतकरी दुसरे काही करू शकत नाही. शेती केली तर मायबाप सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतात उत्पादित झालेल्या शेतमालाचा भांडवली खर्चदेखील वसूल होत नाही. मग शेतकरीवर्गाने जगायचे कसे, हा गहन प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. भाजीपाला खाणाऱ्याला स्वस्त देण्याच्या धोरणामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे आर्थिक भरडला गेला आहे. शेतकरीवर्गाला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती नको, शेतकऱ्यांना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या शेतमालाला भांडवली खर्चाच्या तुलनेत हमी भाव पाहिजे, अशी तीव्र भावना शेतकरीवगार्तून व्यक्त होत आहे.शासनाने आर्थिक बजेटमधे कृषी सिंचनावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करून शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे दाखवले असले, तरी सध्या शेतीत तयार होणारा माल जर कवडीमोल भावाने विकला जात असेल तर सध्या उत्पादन होणारा शेतमाल व सिंचनाचे क्षेत्र वाढल्यावर अधिकचा उत्पादित शेतमाल असे भरमसाट उत्पादन झाल्यावर भविष्यात शेतकऱ्यांचे काय होईल, याची चिंता सर्वसामान्य शेतकरीवगार्ला पडली आहे. शासन हमी भावावर चकार शब्द काढत नाही. फक्त उत्पादन क्षेत्र वाढवण्यावर शासन भर देत असल्याची चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. बाजारात शेतमालाचे दर वाढायला सुरुवात झाली, की शेतकरीवर्ग आनंदी होतो. आता शेतमालाचे चांगले चार पैसे हातात येतील व मी कर्जमुक्त होईन, अशी परिस्थिति निर्माण झाली की शासन लगेच त्याला पायबंद घालते. त्यामुळे शेतकरी अधिकच कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्याला आता कोणीच वाली नाही अशी शेतकरीवर्गाची भावना आहे.