शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:15 AM

टँकरसाठी पाणी येते कोठून, सर्वसामान्यांचा प्रश्न

भोसरी : परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे ढग दाटले आहेत. याबाबतचा निर्णय महापालिका स्तरावर होणार असतानाच चºहोलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांमध्ये आत्तापासूनच तीव्र पाणी टंचाई सुरु झाली आहे. येथील सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी नसताना टँकरसाठी पाणी येते कोठून, असा सवाल चºहोलीकर करीत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या चºहोलीने विकासाच्या बाबतीत गेली अनेक वर्षे वनवास भोगला आहे. हा वनवास दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने नितीन काळजे यांना पहिले महापौरपद दिले. त्यांनी चºहोलीच्या विकासासाठी चांगला निधी मिळविण्यात यश मिळवले असले, तरी चºहोलीचा पाणीप्रश्न सोडविण्यात त्यांनाही अपयश आल्याचे वास्तव आहे. चºहोलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांवर गणेशोत्सवापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी टॅँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर पाण्याऐवजी १५० लिटर पाणी दिले जात असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिका करत असली, तरी चºहोलीतील काही भागात हंडाभर पाणी मिळत नाही.चºहोली परिसरात बांधकामे जोरात आहेत. या प्रकल्पांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. सुमारे अडीच ते तीन हजार रुपये दर आकारून बांधकामांना टँकरद्वारे पाणी मिळते. तर खासगी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवण्यासाठी दोन हजार रुपये आकारले जात आहेत. नद्या, विहिरींमधून टँकरमध्ये पाणी उचलून काळाबाजार करणाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईचा येथील काही राजकीय लोकांनी फायदा घेतला आहे. टँकरने पाणी पुरवल्याचे श्रेय घेणारे राजकीय पुढारी चºहोलीला पुरेसे पाणी मिळवून देण्यात मागे पडल्याचे वास्तव आहे.उन्हाळ्यात भीषणता वाढण्याची भीतीचºहोली गावठाणासह वडमुखवाडी, चोविसावाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, ताजणेवस्ती, बुर्डेवस्ती, दाभाडे वस्ती, साईनगर, जगताप वस्ती, काटे वस्ती या भागात पाणी समस्या तीव्र आहे. पालिकेतर्फे दिवसातून एकदाच पाणी मिळते. तेसुद्धा कमी दाबाने फक्त १५ ते २० मिनिटेच असते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नियोजन न झाल्याने ही परिस्थिती उद््भवली आहे. या भागात टँकर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आहेत. त्यांच्यासाठीच हा प्रश्न लोंबकळत ठेवला जात नाही ना, अशी साशंकता चºहोलीकर व्यक्त करीत आहेत.मी महापौर झाल्यावर लगेच भामा आसखेड प्रकल्प तातडीने राबवला पाहिजे यासाठी आग्रही होतो. शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. याशिवाय दिवसाआड पाणीपुरवठा करावा, तरच सर्वांना पाणी पोहोचेल. चार टप्पे पार करून पाणी येत असल्याने पाणी पुरेसे मिळत नाही. लवकरात लवकर भामा आसखेड व आंद्रा प्रकल्प राबवावा यासाठी प्रशासनाकडे आग्रह आहे. - नितीन काळजे, माजी महापौरगेले वर्षभर पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. कधी पाणीच कमी आहे, तर कधी तांत्रिक कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. पुरेसे मिळणे गरजेचे आहे. रावेत बंधारा, निगडी, गवळीमाथा व त्यानंतर मोशी असे चार टप्पे पार करून पाणी चºहोलीत येत आहे. त्यामुळे चºहोलीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका पाणीपुरवठा विभाग सहकार्य करत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. कमी दाबाने पाणी व तेही दररोज नाही अशी परिस्थिती चºहोलीची झाली आहे. - सुवर्णा बुर्डे, नगरसेविका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड