शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

केवळ अर्धा तासच पाणी; वाल्हेकरवाडीकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 1:58 AM

महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी वाल्हेकरवाडीकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

रावेत : यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी वाल्हेकरवाडीकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’, अशी स्थिती सध्या वाल्हेकरवाडी प्रभाग क्र. १७ मध्ये आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता पाणीकपात करण्यात आली. शुक्रवारी सकाळी केवळ अर्धातासच पाणीपुरवठा करण्यात आला. तोही कमी दाबाने झाला. त्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना मिळाले नाही.येथील गावठाण, लक्ष्मीनगर, भोंडवेनगर, सायली कॉम्प्लेक्स, चिंतामणी चौक, बळवंतनगर, चिंचवडेनगर आदी भागात मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत होते. त्यातच गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी सकाळी काही भागात पाणी आले नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर ‘पाणी’ संकट ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढा पाणीपुरवठा होत होता. परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे. काही भागात पुरेसा तर काही भागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ येत आहे.काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग १७ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे.हंडा मोर्चा काढण्याचा महिलांचा इशारावाल्हेकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ तरी वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.चाकरमान्यांची धावपळसकाळी नियमितपणे ज्या भागात पाणीपुरवठा होतोे त्या भागात अचानकपणे महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता पाणीपुरवठा खंडित केला. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. साधारणत: सकाळी १० वाजता परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला. तोही कमी दाबाने आणि केवळ अर्धा तासच पुरवठा झाला. त्यामुळे चाकरमान्यांची एकच धावपळ उडाली.नियोजनाचा अभावपाणीपुरवठ्याबाबत नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येते. पाणीपुरवठा ही तातडीक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा करणाºया व्हॉल्व्हचा दरवाजा अचानक बंद झाला. त्यामुळे परिसरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. बिघाड लक्षात आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.- सुनील अहिरे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, ब प्रभागवाल्हेकरवाडी - रावेत मार्गावर असणाºया व्हॉल्व्हची झडप अचानक बंद झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता. तत्काळ संबंधित विभागाला कळवून सदर व्हॉल्व्हची लागलीच दुरुस्ती करून घेतली आहे. वाल्हेकरवाडी परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.- सचिन चिंचवडे, उपमहापौर

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड