चिंचवड: रस्त्याचे काम सुरू असताना अनियोजीत कारभारामुळे अंतर्गत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडतात.अशीच घटना आज चिंचवड मधील भोईरनगर चौकात घडली.आज पहाटे अचानक उंच-उंच पाण्याचे फवारे उडाले.आणि या प्रकारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकट अनेकदा घडत असतात.याबाबत कित्येकदा नागरिक संतप्त व्यक्त करतात.मात्र अधिकारी व ठेकेदारांची लागेबांधी असल्याने अशा घटना दुर्लक्षीत केल्या जातात.याचाच प्रत्यय आज पुन्हा पहावयास मिळाला.भोईर नगर चौकात रस्त्याचे काम सुरू आहे.या ठिकाणी आज पहाटे पाण्याची जल वाहिनी फुटून पाण्याचे उंच-उंच फवारे उडत होते.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची घावपळ झाली.अनेक जण संबंधीत विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.पाण्याचा प्रवाह वाढत होता. रस्त्यासाठी खोदलेल्या भागात पाणी साठत राहिल्याने परिसरात तलाव सदृश्य परिस्थिती झाली.सुमारे दीड तासाहून अधिक वेळ पाण्याची वाहत राहिल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. अनेक जण या ठिकाणी फोटो काढण्या साठी गर्दी करीत होते. परिसरातील नागरिक या अनियोजीत कारभाराबाबत संतप्त व्यक्त करीत होते.घटनेसाठी दोषी असलेल्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.