शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

पिंपरीत नियोजनाअभावी पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:43 AM

पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कंठशोष करूनही प्रशासन ढिम्म आहे. पाणीपुरवठा ...

पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कंठशोष करूनही प्रशासन ढिम्म आहे. पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक आज झाली. पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेवर सत्ताधाºयांनी जोरदार टीका केली. नियोजनाअभावी पाणीटंचाई झाली असून, दोन दिवसांत पाणी सुरळीत झाले नाही, तर प्रशासनाविरोधात आंदोलन करू, असा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे.

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक, नगरसेवक त्रस्त आहेत. तक्रारी वाढू लागल्याने महापौरांनी आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. महापौरांसह पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपअभियंते, पाणी सोडणारे कर्मचारी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यास पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी कारणीभूत आहेत. अनेक सूचना देऊनही दखल घेतली जात नाही. आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना जर पाणीपुरवठा विभाग उत्तरे देऊ शकत नसेल, तर दुर्दैवाची बाब आहे. धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, पाणी आरक्षणानुसार मिळत आहे. पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारायला हवा. नियोजनाअभावी पाणीटंचाई आहे. नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर द्यावे लागते. निष्क्रिय प्रशासनाला वठणीवर आणण्याची गरज आहे. कामचुकार अधिकारी कोणीही असो, आता त्याची गय केली जाणार नाही. दोन दिवसांत पाणी सुरळीत झाले नाही, तर त्यास जबाबदार अधिकाºयावर कारवाई केली जाईल. निलंबित केले जाईल. तरीही कामात सुधारणा न झाल्यास जनतेसाठी मी आंदोलन करीन.

प्रशासनाचा हलगर्जीपणापाणी पुरेसे असूनही टंचाई आहे. नियोजन नसल्यामुळे हे घडत आहे. त्यास प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. गळती शोधण्याची गरज आहे. तसेच जे काम करणार नाहीत किंवा पाणीटंचाईस कारणीभूत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील पाणीपुरवठ्याची माहिती विचारली होती. मात्र, त्याचे उत्तरही देता आले नाही, असे सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड