पिंपरी : शहरातील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र्रातील पाणीपुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. विविध दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सायंकाळी बंद राहणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रावेत पम्पिंग स्टेशनमधील विद्युत विभागाची तातडीची आवश्यक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे गुरुवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळी एकवेळेस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणीपुरवठाबंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठाकरून घ्यावा आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांनी दिली.
शहराचा पाणीपुरवठा आज सायंकाळी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 3:07 AM