पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जल शुद्धिकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे कामकाज गुरुवारी (दि.२९) सकाळपासून करण्यात येणार आहे. या काळात एमआयडीसीकडून शहराच्या विविध भागात होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.
तसेच, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.३०) कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड,भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर ॲड डी-दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील नागरिकांनी पाण्याचा अगोदर साठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.