शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

तळेगावात १५ जूनपासून पुरेसा पाणीपुरवठा

By admin | Published: May 31, 2017 2:04 AM

गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य देत यंत्रणेतील दोष दूर करून तळेगाव

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य देत यंत्रणेतील दोष दूर करून तळेगाव आणि स्टेशन विभागातील नागरिकांना येत्या १५ जूनपर्यंत पुरेसा, सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात पवना व इंद्रायणी नदीवरील पंपासाठी २४ तास वीजपुरवठा करणारे एक्स्प्रेस फीडर्स बसविण्यात आले असून, त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उचलणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती सुनील शेळके यांनी दिली.भाजपा, तळेगाव शहर जनसेवा विकास समिती आणि आरपीआय यांच्या गेल्या पाच महिन्यांतील सत्ताकाळातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेळके यांनी ही माहिती दिली. या वेळी आमदार बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभागृह नेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक इंदरमल ओसवाल, सचिन टकले आदी उपस्थित होते.तळेगावातील पाणी प्रश्नाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता युद्धपातळीवर असल्याचे सांगून शेळके म्हणाले की, शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन टप्प्यात पाणी योजनेच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १६ एमएलडी पाणी पवना नदीवरून उचलण्याची परवानगी नुकतीच प्राप्त केली आहे. इंद्रायणी नदीवरूनही १० एमएलडी पाणी उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा सुसज्ज केली आहे. एक्स्प्रेस फीडर्समुळे अखंडित वीजपुरवठा प्राप्त झाला असून त्यामुळे संपूर्ण शहरास नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. येत्या ७ जून रोजी त्याचे उद्घाटन होत आहे.तळेगाव शहरासाठी दीर्घकालीन इंद्रायणी योजनेसाठी ६३ कोटी रुपये खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे आमदार भेगडे यांनी सांगितले.स्मार्ट नियोजनाने मोठी बचतपाणी योजनेतील दुरुस्ती, सुधारणा आणि सक्षमीकरण करताना स्मार्ट नियोजन केल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. इंद्रायणी योजनेची पाणी क्षमता ५ एमएलडीवरून १० एमएलडी करण्यासाठी २ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, ती केवळ ६४ लाखातच पूर्ण केली. दोन कोटी २० लाख रुपयांची बचत केली. सोमाटणे पंपासाठी दरमहा १९ लाख रुपये वीजबिलाचा खर्च येतो. त्यात तांत्रिक बदल केल्याने सुमारे चार लाखाची बचत होणार आहे. अतिरिक्त पाणी उचलले गेल्याने गेली चारपाच वर्षे दरमहा ५५ हजार रुपयांचा दंड जीवन प्राधिकरणाकडे भरावा लागत असे. आता जादा पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त केल्याने तो खर्चही वाचणार आहे. याच पंपावरील मोटारीसाठीच्या एक कोटी ९३ लाख खर्चातून ४६ लाख रुपयांची बचत केली आहे. पुढील वर्षात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा संकल्प आहे. - सुनील शेळके, उपनगराध्यक्ष