शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीबाणी

By admin | Published: May 24, 2016 5:55 AM

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै अखेरपर्यंत शहराची तहान भागू शकेल. मात्र, हवामानाचे अंदाज दिवसेंदिवस बदलत असून, जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास शहरावरही पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पाणीकपातीचे नियोजन हाती घेतले. मागील पावसाळ्यात पवना धरण क्षेत्रात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. हा पाणीसाठा वर्षभर पुरविणे अशक्य असल्याने महापालिकेने ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. दरम्यान, पाणीपातळी जास्त खालावू लागल्याने तसेच जूनमध्ये पावसाचा नेमका अंदाज नसल्याने ३ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरूकरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी धरणात २.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या पवना धरणात केवळ १.७७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दर दिवशी २१ दशलक्ष घनफूट लिटर पाण्याचा विसर्ग होतो. सध्याचा पाणीसाठा शहराला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, सध्या उपलब्ध पाणीसाठ्यात महापालिका दिवसाला ३०० ते ३१५ एमएलडी पाणी उचलत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) दरदिवशी ८० एमएलडी, तसेच वाघोलीसाठी दरदिवशी ३० एमएलडी पाणी उचलले जात आहे. यासह तळेगाव, देहूरोड या मोठ्या शहरांसह पवना धरणापासून ते रावेत बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रालगत शेतीसाठीही पाणी उचलले जाते. (प्र्रतिनिधी)सध्या १.७७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच १७५६ दशलक्ष घनफूट लिटर पाणीसाठा आहे. यातून दर दिवशी २१ दशलक्ष घनफूट विसर्ग होत आहे. यापैकी १६ दशलक्ष घनफूट महापालिका आणि औद्योगिकसाठी असून, ४ दशलक्ष घनफूट शेतीसाठी आणि वहनात जाते. सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरू शकेल.- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण