शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

आम्ही जातो आमच्या गावा...तुमचा प्रवास सुखाचा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:08 PM

घराचे वेध लागलेल्या मध्यप्रदेशातील ७६ जणांना आज निरोप

ठळक मुद्देकेशवनगर मधील महापालिकेच्या शाळेत २६ व चिंचवड परिसरातील ५० नागरिक होते वास्तव्याला

पिंपरी - चिंचवड :-  वेळ दुपारी तीन वाजताची चिंचवड गावातील क्रांतिवीर चापेकर चौकात महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद चा नारा सुरू झाला.निवारा केंद्रातून परतीच्या प्रवासासाठी गावाकडे जाण्याचा मार्ग खुला होताच मागील चाळीस दिवसांपासून घराचे वेध लागलेल्या मध्यप्रदेशातील ७६ जणांना आज सुखरूप निरोप देण्यात आला.पालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीची परतफेड शब्दांतून व्यक्त करत निवारा केंद्रातील नागरिकांनी आम्ही जातो आमच्या गावा म्हणताच आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणत या सर्वांना निरोप देण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आला.अचानक ओढवलेल्या या संकटात अडकलेल्या अनेक मजूर व त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले.राहण्यासाठी घर नसल्याने वणवण भटकणाऱ्या नागरिकांना महापालिका प्रशानाने निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था केली.लॉक डाऊन वाढत चालल्याने अनेक परराज्यातील नागरिकांना घरचे वेध लागले होते.केशवनगर मधील महापालिकेच्या शाळेत वास्तव्यास असणाऱ्या २६ व चिंचवड परिसरातील ५० नागरिकांना आज त्यांच्या मूळगावी जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात आला.हे सर्वजण आज दुपारी चिंचवड मधून पुण्याकडे बसद्वारे रवाना झाले.लॉकडाऊन काळात येथील नागरिकांना अग्रेसर भवन मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भोजन व्यवस्था उपलब्ध केली होती.महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी,ब प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी प्रभावती गाडेकर कर्मचारी रसूल शेख,अजय गायकवाड,वाहन चालक हनुमंत शिंदे,विद्या कावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव,पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.चिंचवड पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले.या नगरिकांना परतीच्या प्रवासासाठी सुरक्षिततेची साधने,फूड पॅकेट देण्यात आले.गावाकडे जाण्याचा मार्ग सुखकर झाल्याने सर्वांचे चेहरे हस्याने फुलले होते.प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व यंत्रणेचे आभार मानले.आज रात्री आठ वाजता पुणे स्टेशवरून रेल्वेने हे मध्यप्रदेश कडे रवाना होणार आहेत.

  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMadhya Pradeshमध्य प्रदेशLabourकामगार