शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दोन पर्यवेक्षकांवर ६३२ शाळांचा भार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 1:57 AM

महापालिकेच्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांवरील अतिरिक्त ताण दिवसेंदिवस वाढतच आहे.

- प्रकाश गायकर पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांवरील अतिरिक्त ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन महिन्यांपासून शिक्षण विभागात चार पर्यवेक्षक होते. परंतु, कामाचा अतिरिक्त भार बघून दोन पर्यवेक्षकांनी राजीनामा दिल्याने केवळ दोन पर्यवेक्षकांना शिक्षण विभागाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे.शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ शाळा असून, खासगी ५२७ शाळा आहेत. अशा एकूण ६३२ शाळांचा कारभार फक्त दोन पर्यवेक्षकांच्या खांद्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी सहा पर्यवेक्षक शाळांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते. मागील दोन महिन्यांपूर्वी दोन पर्यवेक्षकांनी राजीनामा दिल्याने चार पर्यवेक्षक काम पाहत होते. मध्यंतरी चार पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र शिक्षण विभागातील वाढत्या कार्यभाराकडे पाहून शिक्षक पर्यवेक्षक पदावर रुजू होण्यास तयार होत नाहीत. चार पर्यवेक्षकांपैैकी दोन पर्यवेक्षकांनी राजीनामा दिल्याने आता शहरातील सर्व शाळांची जबाबदारी फक्त दोन पर्यवेक्षकांवर आली आहे.पर्यवेक्षकांना पालिका शाळांवर नियंत्रण ठेवणे, विविध उपक्रम राबविणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे, शाळांची पाहणी करणे, मुख्याध्यापक-शिक्षकांशी समन्वय राखणे अशी कामे करुन शाळांची गुणवत्तावाढ व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु, सद्य:स्थितीत शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांच्या खांद्यावर इतर कामाव्यतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे शाळांकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामाचा भार बघता सात ते आठ पर्यवेक्षकांची गरज आहे. एवढ्या शाळांची धुरा अवघ्या दोन पर्यवेक्षकांवर असल्याने शाळांची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता आहे.>प्रामाणिक कर्मचाºयांच्या खांद्यावरच बोजाशिक्षण विभागामधील पर्यवेक्षकांची अतिरिक्त कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यवेक्षकांचे मुख्य काम दूरच राहत आहे. या विभागातील काही कर्मचारी केवळ फायली हातात घेऊन दिवसभर महापालिकेत चकरा मारताना दिसतात. मात्र जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्या खांद्यावर अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जात असल्याचे चित्र शिक्षण विभागात दिसून येत आहे.