पिंपरी : पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची ३० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना २४ ते ३० जानेवारी या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी कुमारजीत देबाशीश शर्मा ( वय ३९) यांनी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, एका अनोळखी मोबाइलधारकावर तसेच विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉटसअपवर आरोपीने पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. यासाठी एका टेलिग्राम अकाऊंटवर विविध टास्क देऊन ते टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यातून फिर्यादी यांनी कमावलेले पैसे वेळोवेळी विविध अकाउंटवर पाठवायला सांगून फिर्यादी यांची ३० लाख २० हजार ३७० रुपयांची फसवणूक केली.