शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

टोलमधून सूट दिलेल्या वाहनांचे काय ?

By admin | Published: October 05, 2015 1:27 AM

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील टोलवसुलीतून करारानुसार अपेक्षेपेक्षा अधिक

पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील टोलवसुलीतून करारानुसार अपेक्षेपेक्षा अधिक वसुली झाल्याचे स्पष्ट झाल्याने रस्ते विकास महामंडळाने या महामार्गावरून ज्या वाहनांना टोलमधून सूट दिली आहे, अशा वाहनांचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी पुढे आली आहे़ एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील टोलवसुलीचे कंत्राट २००४ मध्ये आयआरबी कंपनीला देण्यात आले़ त्यावेळी या महामार्गावरील वाहनांची संख्या अतिशय कमी दाखविण्यात आल्याने त्यावर करण्यात येणारा खर्च वसुलीसाठी १५ वर्षे टोलवसुलीचे हक्क देण्यात आले़ पण, नंतर वाहनांची संख्या वाढल्याने अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक टोलवसुली आतापर्यंत झाली आहे़ त्यामुळे निर्धारित वर्षांपेक्षा अगोदरच कंपनीचा सर्व खर्च वसुली होणार असल्याचे स्पष्ट झाले़ माहिती आयुक्तांनी दिलेल्या दणक्यानंतर आता रस्ते विकास महामंडळाने एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि वसूल झालेला टोल याचीच माहिती दिली आहे़ याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, की रस्ते विकास महामंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली माहिती ही अपूर्ण आहे़ त्यांनी केवळ टोल भरलेल्या वाहनांचीच माहिती दिली आहे़ टोलमधून सूट दिली आहे, अशा वाहनांचा तपशील द्यावा़ या वाहनांचे प्रकार व त्यांचे क्रमांकही उपलब्ध उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे़ याबरोबरच महामार्गावर टोल भरणाऱ्या वाहनांना योग्य ती सेवा मिळत आहे का? त्यांची काय तक्रार आहे?़ या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे़ आयआरबी कंपनी आणि रस्ते विकास महामंडळाने केलेल्या करारामध्ये अनेक अटी कंत्राटदार कंपनीवर घालण्यात आल्या आहेत़ त्यात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला कुंपण घालणे, संरक्षक कठडे उभारणे तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला १ लाख झाडे लावणे, अशा अनेक अटी आहेत़ या अटींचे पालन झाले आहे का?़ याची तपासणी करण्यासाठी एमएसआरडीने तातडीने एक कमिटी स्थापन करून त्याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)