पिंपरी : आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या तयारीलाही वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या पक्षांतरामुळे समर्थकांची कोंडी होत आहे. एका बाजुला उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड अन् मतदारांपर्यंत पोहोचण्याची चिंता आहे. यामुळे समर्थकांची धावपळ सुरू असून, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी स्थिती आहे. महापालिका निवडणूक फेबु्रवारी महिन्यात होणार या दृष्टीने इच्छुकांची आधीपासून तयारी सुरु होतीच. आपल्या स्थानिक नेत्यांमुळे तिकीट मिळण्याची हमी वाटत होती. मात्र, मतदानाची नेमकी तारीख जवळ आली. अन् नेत्यांनी पक्षांतराला सुरवात केली आहे. आतापर्यंत आचारसंहिता कधी लागेल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता तारीख निश्चित झाल्याने खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारयंत्रणा तयार केली आहे. प्रभागाच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीतील समर्थकांनी स्थानिक नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत. मतदारांपर्यंत पोहोचणे याबाबतचे नियोजन आखले आहे.मात्र, अचानक नेत्यांनी पक्षांतर केल्याने समर्थकांची कोंडी झाली आहे.दरम्यानच्या काळात इच्छुकांनी प्रभागात फिरुन व कार्यक्रमाद्वारे पक्षाचे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवले आहे. परंतु अचानक आपल्या नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे इच्छुकांची पंचाईत झाली आहे.(प्रतिनिधी)प्रचारासाठी अवघे १४ दिवसनिवडणुकीसाठी २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ४ फेबु्रवारीला अर्जांची छाननी होणार आहे. दि. ७ फेब्रुवारीला अर्जमाघारीची मुदत असून, या दिवशी निवडणूक रिंगणात किती जण असतील, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर २१ फेबु्रवारीला मतदान होईल. मुलाखत घेतलेल्यांचे काय?शहरातील स्थानिक नेत्यांसह काही पदाधिकारी पक्षांतर करीत आहेत. दरम्यान, ज्या पक्षात दाखल झाले आहेत, त्या पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी नेत्यापाठोपाठ पक्षांतर केल्यास मुलाखत दिलेल्या इच्छुकांचे काय होणार, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.कार्यकर्त्यांची झाली द्विधा मनस्थितीवर्षानुवर्षे एका पक्षाचे काम करुन विविध पदे भोगली आहेत. तरीही नेत्यांपाठोपाठ लगेचच पक्षांतर करण्याची अद्यापही अनेक समर्थकांची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. यासह नेत्यांपाठोपाठ पक्षांतर केल्यास तिकडून उमेदवारी मिळेल का, याचीही धास्ती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीलापासून उमेदवारीअर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. आपण कोणत्या पक्षाकडे जायचे, कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशा द्विधा मनस्थितीत कार्यकर्ते आहेत. कमी कालावधीत अधिकाधिक नागरिकांपर्यंत कसे जाता येईल, याबाबत नियोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे.
समर्थकांचे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’
By admin | Published: January 14, 2017 2:50 AM