शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

अज्ञान उघड होताच नगरसेवकांचे निलंबन मागे

By admin | Published: April 25, 2017 4:15 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभेत गैरवर्तन केलेल्या विरोधी पक्षनेत्यांसह चौघांना निलंबित केले होते. ही कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभेत गैरवर्तन केलेल्या विरोधी पक्षनेत्यांसह चौघांना निलंबित केले होते. ही कारवाई नियमबाह्य असल्याने अज्ञान उघड झाल्याने आणि चूक लक्षात आल्याने कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, म्हणून महापौर नितीन काळजे यांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, मयूर कलाटे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. ‘सदस्यांच्या विनंतीनुसार कारवाई मागे घेत आहे, असे महापौर सांगत असले तरी संबंधित सदस्यांनी कोठेही आपली चूक कबूल न केल्याचे महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सानेंचे नगरसेवक पद रद्द करण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला उपरती का आली? याबाबत पालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. महापालिकेत सत्तांतर होऊन भारतीय जनता पक्षाच्या एकमुखी सत्ता आली आहे. महापालिकेत पहिली सर्वसाधारण सभा झाली. शास्तीकराच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना शंभर टक्के शास्ती माफीच्या मुद्यावरून गोंधळ झाला. त्या वेळी गैरवर्तनाचा मुद्दा उपस्थित करून महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांसह चौघांना निलंबित केले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याने सर्वपक्षांनी एकजूट केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी महापौरांनी केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचे पुरावे दिले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने महापौरांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखिणार असल्याचे नमूद केले होते. चूक लक्षात येताच यू टर्नविरोधी पक्षनेत्यांनी कायद्याच्या आधारे आक्षेप घेतल्याने कारवाईबाबत महापौरांनी यु टर्न घेतला. निलंबनाचा कालावधी कमी करण्यात येत आहे. या वाक्यावरून कारवाई चुकीची असल्याचे निष्पन्न होत आहे. दिनांक २० एप्रिलपासून ४ मेपर्यंत असणारा कालावधी २१ एप्रिलपासून सभांना उपस्थित राहण्याबाबत प्रतिबंध करण्यात येणार नाही. संबंधितांना पंधरा दिवसांच्या कालवधीसाठी निलंबित केले होते. विनंतीनुसार कारवाई मागे घेतली आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. महापौर काळजे म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेत्यांसह चारही नगरसेवकांनी निलंबन कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती केली होती. आपल्याला शहराचा विकास साधायचा आहे. त्यामुळे सर्वांना एकत्रितपणे घेऊन काम करायचे असल्याने निलंबन मागे घेतले आहे. सभागृहात शिस्त असावी म्हणून संबंधित निर्णय घेतला होता. निलंबन करण्यासाठी आणि मागे घेण्यासाठी कोणाचाही दबाव नव्हता, नसेलही.’’ नेत्यांनी काढली खरडपट्टीचुकीच्या पद्धतीने सभागृहांचे कामकाज चालविल्याने पक्षाची बदनामी झाली आहे. याची दखल भाजपाच्या नेत्यांनी घेतली असून, पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘पक्षाची बदनामी होईल, असे वर्तन करू नका? ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यानुसार कामे करा, दुसऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणू नका? अशी कानटोचणी नेत्यांनी केली.(प्रतिनिधी)