Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:14 PM2024-10-09T16:14:59+5:302024-10-09T16:15:52+5:30

चिंचवड विधानसभेची जागा महायुतीत भाजपला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने नाना काटेंनी अजित पवारांची साथ सोडण्याचे ठरवले

When will Nana Kate join Sharad Pawar group Thorns told Time | Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ'

Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ'

पिंपरी चिंचवड: चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत अश्विनी यांचा विजय झाला. तर नाना काटे यांचा पराभव झाला. आता मात्र अजित पवार महायुतीत आहेत. अश्विनी जगताप यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे नाना काटेंच्या हाताला काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता असल्याने नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आचारसंहितेपुर्वी शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.    

काटे म्हणाले, चिंचवड विधानसभा लढण्याच्यादृष्टीने मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवा मार्ग निवडणार आहे. अजित पवार यांच्यानंतर शरद पवार साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच, असं म्हणत त्यांनी शरद पवार गटात आचारसंहितेपुर्वी प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. ज्यांना आमदार व्हायचंय ते स्वतंत्र मार्ग निवडत असल्याचे सांगत अजित पवारांनी पक्ष बदलण्यासाठीचे मार्ग खुले केले आहेत.  नाना काटेंच्या या निर्णयाने अजित पवारांना चिंचवड विधानसभेत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्र्वादीत फूट पडण्याच्या आधी अजित पवारांना पिंपरी चिंचवडच्या मतदारांचा पाठिंबा होता. चिंचवड विधानसभेतील अनेक निष्ठावंत अजित पवारांसोबत राहिले आहेत. नाना काटे हेदेखील अजित पवारांचे कट्टर समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे सध्या महायुतीसोबत असले तरी जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: When will Nana Kate join Sharad Pawar group Thorns told Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.