शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
5
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
6
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
7
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
8
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
9
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
10
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
11
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
12
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
13
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
14
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
15
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
16
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
17
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
18
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
19
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
20
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटणार कधी?

By admin | Published: January 22, 2017 4:43 AM

महागांव चांदखेड जिल्हा परिषद गट मावळ तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या सांगवडे या गावापासून सुरू होतो, तर पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे तुंग गावाजवळ संपतो.

पवनानगर : महागांव चांदखेड जिल्हा परिषद गट मावळ तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या सांगवडे या गावापासून सुरू होतो, तर पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे तुंग गावाजवळ संपतो. या गणात ४९४५१ मतदार संख्या आहे. पवना धरण, कासरसाई धरण, मळवंडी धरण, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, तुंग, तिकोणा, लोहगड, विसापुर किल्ले, प्रतिपंढरपूर दुधिवरे, बेडसे लेणी आदी प्रमुख ठिकाणे या गटात येतात. या गट पुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात होता. २०१२ मधील निवडणुकीत तो भाजपाच्या ताब्यात गेला. भौगोलिक दृष्ट्या डोंगरालगतची गावे व ऐतिहासिक स्थळे व भरपुर पाण्याची साठवण असलेला हा गट आहे. शेती व कुकुटपालन फुलशेती शेळी पालन दुग्ध व्यवसाय हे जोड व्यवसाय या भागातील उत्पादनाचे मुख्य स्त्रोत्र आहे. पवना धरणातून नेण्यात येणारी बंद जलवाहीनी प्रकल्प कायम रद्द व्हावा. पवना, पुसाणे धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. मळवंडी ठुले धरणग्रस्थांचा प्रश्नही प्रलंबितच आहे. येथिल रस्ते सुधारून ्र प्रत्येक गावात एस्टी बस जावी. या विभागाला पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करावे. पर्यटनाला चालना दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पवनानगर, शिवणे चांदखेड, करुंज, बेबडओहळ, जवण, शिळीम येथे बस थांबे उभारावेत. चांदखेड येथे मुलीसांठी महाविद्यालय उभारणे गरजेचे आहे. मुबलक पाणी असूनही अनेक गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत. आढले डोणे प्रादेशिक पाणी योजना बंदच आहे. गुलाब फुले, पालेभाज्या, इंद्रायणी तांदुळ, दुध यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे आणि पवनानगर, चांदखेड, बेबडओहळ येथे आठवडे बाजार सुरू करणे गरजेचे आहे. पवना कृषक सेवा शेतकरी संस्थेला उर्जितावस्था आणावी, अनेक गावातील स्मशानभूमी शेड उभारावे आदी मागण्याही आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण सुधारणे गरजेचे आहे. बेबडओहळ येथील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे, ते काम लवकर पूर्ण करावे. शिवणे- सडवली दरम्यान पवना नदीवर पूल व्हावा. वाहतूक व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. - राजेंन्द्र देशमुख, बेबडओहळ तालुक्यातील आणि या गटातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या भागातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याची तातडीने डागडुजी आणि दुरस्ती करावी. प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्याची कामे व्हावीत. धरणग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुर्नवसन व्हावे. - तानाजी शेंडगे, मा उपसरपंच करूंज विज पाणी रस्ते हया महत्वाच्या समस्या आसल्या तरी बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करणे हे.या गटासाठी मोठे काम आहे हा संपुर्ण भाग निर्सग सैदयार्ने नटलेला आसल्याने अ‍ॅग्रो टुरिझम मार्फत युवकांना चांगला व्यवसाय मिळू शकतो . रस्त्याची दुरावस्था आहे ते आधिक चांगले झाले तर दळणवळण वाढेल व शेतकयार्ना बाजारात शेतमाल नेण्यासाठी मदत होईल. - ज्ञानेश्वर आडकर, माजी सरपंच शिवली महागांव चांदखेड गट हा डोगराळ भागात आसून या भागातील मुलांचे शिक्षणाचे हाल आदयाप सुरू आहे पुणेजिल्हा परिषदेने या भागाचा भैगोलाक आभ्यास करून मुलांना त्या भागातच उच्च शिक्षणापर्यत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. तर तुंग तिकोणा लोहगड किल्याचा पुरतत्व खात्याकडे पाठपुराव करून या ठिकाणी पर्याटन स्थळ केली तर मोठयाप्रमाणात लघुउदयोगांना चालना मिळेल.- प्रकाश म्हस्कर, तुंग गटातील गरजू महिलांसाठी पवनानगर येथे रोजगार प्रशिक्षण मिळावे. आवश्यक तेथे शौचालये उभारावीत पवनानगर येथे पोलिस चौकी उभारावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमीत आणि सक्षम करावी. याबाबतच्या समस्या दूर कराव्यात -वैशाली खुंटाळे, पवनानगर वाडी-वस्त्यावर पाणी पोहोचणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारून ग्रामीण मुलांना चांगले शिक्षण मिळावे. जिल्हा परिषदेच्या शाळांना व अंगणवाडीला इमारती नवीन मिळाव्या. तालुक्यातून जेवढे सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जातील, त्यांनी तालुक्यासाठी जादा निधी आणावा. - नामदेव ठुले, माजी सरपंच मळवंडी ठुले.पवनमावळात गावागावापर्यत रस्ते पोचले आहे परंतु आंर्तरगत रस्ते होणे गरजेचे आहे. या भागातील सुवासिक इंद्रायणी तांदळाला पुणे मुंबई महामार्गावर विक्रीसाठी एक केंद्र तयार करून दिले तर पुर्ण देशात या तांदळाला मागणी वाढेल या साठी जिल्हा परिषद सदस्याने पुढाकार घ्यावा .- सुदाम घारे, येलघोल