देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील देहूरोड बाजारपेठेसह सात प्रभाग, देहूरोड लष्करी भागात जमा होणारा सर्व कचरा देहूरोड दारुगोळा कोठाराजवळ माळरानावरील खाणीजवळ जमा करण्यात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चार दिवस स्थानिक लष्कराने कचरा टाकण्यास मज्जाव केला होता. कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या व इतर वाहने रोखल्याने त्या वेळी घरातला कचरा घरातच ठेवण्याची वेळ आल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. सार्वजनिक ठिकाणीही कचऱ्याचे ढिग साचले होते. त्या वेळी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत लवकरच पर्यायी व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र कचराडेपोबाबत एक वर्षानंतर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही . त्यातच गेल्या दहा दिवसांपूर्वी कचरा डेपोला आग लागल्याने निगडी, रुपीनगर, यमुनानगर आदी भागात नागरिकांना धुराचा मोठा त्रास झाला असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता . कचरा डेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी बोडार्चे अधिकाऱ्यांनी बोर्डचे कर्मचारी, विविध यंत्रसामुग्रीचा वापर करून तसेच आगीच्या बंबासाठी स्थानिक लष्कर, महापालिका यांची मदत घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी बुधवारपर्यंत ( दि १६) काही प्रमाणात आग धुमसत होती . डेपोत ज्या ठिकाणी धूर दिसेल त्या ठिकाणी तातडीने जेसीबी यंत्राच्या साह्याने माती टाकून आग विझविण्यात येत आहे, तसेच कचरा डेपोतील कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे नऊ -दहा कर्मचारी मदत करीत आहेत . डेपोत जमा होणारा कचऱ्याचे नियमित वर्गीकरण करण्यासाठी व कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट; लावण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला दरमहा सरासरी सव्वा लाख रुपये देण्यात येत असून कचरा डेपोला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असताना तसेच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांच्यासह बोर्डाच्या सर्व सदस्यांनी कचरा डेपोमुळे निर्मण झालेल्या समस्यांची पाहणी करून योग्य उपाययोजना करण्याबाबत बोर्डाच्या आरोग्य विभागाला सूचना दिल्या असून आग बुजविण्याचे काम सुरु आहे. कचऱ्याच्या डेपोपासून जवळच लष्कराचे देहूरोड दारुगोळा कोठार असून कचयार्चा त्रास होत असल्याने लष्कराने गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात बोर्ड प्रशासनाला पत्र पाठवून कचरा डेपो सध्याच्या जागेवरून हलविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र निगडीतील परमार कॉम्प्लेक्स समोरील मोकळ्या मैदानात सर्व कचरा गोळा करण्याबाबत लष्कराने सुचविले होते. मात्र सदर जागा नागरी वस्ती, लष्करी अभियंता पाणी पुरवठा केंद्र व महामार्गालगत असल्याने त्याठिकाणी कचरा डेपो हलविण्याचा निर्णय झाला नाही . शितळानगर भागात कचरा डेपो सुरु करण्यासाठी पाच एकर जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी कचरा जमा करून आधुनिक यंत्राच्या साह्याने कच?्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न होत असताना काही संघटना व नागरिकांनी या कचरा डेपोला विरोध केला होत आहे . त्यामुळे कचरा डेपोबाबत अद्याप निश्चित निर्णय झाला नसून प्रशासनाने लवकर निर्णय घेण्याची गरज आहे . बोर्डाच्या कचरा डेपोत जमा होणार्या कचर्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याद्वारे खत निर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी बोडार्ने सुमारे अठरा लाख बावीस हजार रुपयांची आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी पुण्यातील लष्कराच्या सदर्न कमांडकडे पाठिविलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे . मात्र स्थानिक लष्कराने सध्याच्या कचरा डेपोत यंत्रसामुग्री बसविण्याऐवजी मोठ्या वाहनावर यंत्र बसवून ते वाहन दररोज कचरा डेपोतून हलवावे असे सुचविले आहे मात्र यंत्र दररोज हलविणे जिकिरीचे असून याबाबत प्रशासन व लष्कर यांच्यात लवकरच चर्चा अपेक्षित आहे. आधुनिक यंत्रसामुग्री बसविल्यानांतर कच?्याच्या प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले जात असल्याने त्याबाबत होणाऱ्या निर्णय प्रक्रियेला गती मिळण्याची गरज आहे.
कचराडेपोचा प्रश्न कधी मार्गी लागणार?
By admin | Published: November 18, 2016 4:48 AM