लोकमत न्यूज नेटवर्कआंबेगाव बुद्रुक : महानगरपालिका हद्दीतील आंबेगाव पठार येथील डीपी रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून अर्धवट रहिलो असून, या रस्त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.रखडलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून रखडले असून साईसिद्धी चौक ते प्राईड स्कूलपर्यंत महापालिका हद्दीतील रस्ता दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. परंतु प्राईड स्कूल ते कात्रज महामार्ग अभिनव स्कूलपर्यंत हा रस्ता अपूर्ण आहे. पावसाळा सुरु असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. अपघात घडत आहेत. या मुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.हा रखडलेला रस्ता खासगी मालकाच्या जागेतून जात असल्याने या जागामालकांना या जागेचा मोबदला दिल्याशिवाय जागामालक परवानगी देत नसल्याचे दिसत आहे. जागेचा प्रश्न तत्काळ सोडवून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जागामालकाशी बोलणे सुरु असून, लवकरच जागामालकांना त्यांचा मोबदला दिला जाणार असून, रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
रस्त्याचे काम कधी सुरू होणार ?
By admin | Published: July 17, 2017 4:13 AM