शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

"मराठी सिनेमांची गळचेपी थांबणार कधी?" दिग्दर्शकानं टीडीएम चित्रपटाचं प्रदर्शन थांबविलं

By विश्वास मोरे | Published: May 02, 2023 10:58 PM

चित्रपट निर्माण होणार कसे? मराठीची गळचेपी थांबणार कधी? अशी संतप्त भावना कऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी: थिअटर मिळत नसल्याने राष्ट्रपती पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांनी आजपासून टीडीएम चित्रपटांचे प्रदर्शन थांबविले आहे. थिअटरमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याने कऱ्हाडे यांनी भूमिका घेतली आहे. ‘मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळणार नसेल? तर मराठी चित्रपट सृष्टीत चांगले  चित्रपट निर्माण होणार कसे? मराठीची गळचेपी थांबणार कधी? अशी संतप्त भावना कऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केली.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ठराविक वितरकांची एकाधिकारशाही आहे. त्यामुळे मराठीतील  चित्रपटांना थिअटर मिळण्यात अडचणी येतात. नवीन निर्माते आणि दिग्दर्शकांनी तयार केलेल्या चांगल्या कलाकृती चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. ख्वाडा, बबनच्या यशानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते, प्रयोगशील दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अचानकपणे थिअटर चालकांकडून शो रद्द केले जात आहेत.  त्यामुळे कराडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले आहे.

कऱ्हाडे म्हणाले, ‘‘एक चित्रपट कलाकृती निर्माण करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कलाकृतीची निर्मिती केल्यानंतर तो रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. कलाकृती चांगली असून फायदा नाही. ती रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे. माझा चित्रपट जिथे प्रदर्शित झालाय, तिथे चांगले ओपनिंग आलंय. मात्र, बहुतांश ठिकाणाहून महत्वाच्या वेळेचे शो रद्द होत आहेत. जिथे थिअटर हवे तिथे प्राईम टाइम देत नाहीत. मराठी चित्रपटाबाबतचा हा अन्याय चीड आणणारा आहे. माझ्यासारख्या अनेकांना त्रास होत आहे. राज्यात मुंबई वगळता साडेतीनशे सिनेमागृहे आहेत. त्यापैकी केवळ शंभर शो मिळाले. पुण्यात दिवसाला दीडशे शो होतात. त्यात आमच्या चित्रपटास हवे तेवढे शो नाहीत.’’कोणाचा दबाव आहे कळत नाही!आमच्या चित्रपटास प्राईम टाईम वेळ का नाही? याबाबत काही चित्रपटगृह चालकांशी संवाद साधला तर त्यांनी आमच्यावर दबाव आहे, असे सांगितले. कोणाचा दबाव आहे, हेही सांगितले जात नाही. असे जर होणार असेल तर मराठी चित्रपटांचे काय होणार? चांगल्या कलाकृती निर्माण होणार का?  त्यामुळे आम्ही आजपासून प्रदर्शन थांबवित आहोत.भाऊराव कऱ्हाडे (चित्रपट दिग्दर्शक)

टॅग्स :Marathi Movieमराठी चित्रपट