पिंपरी: अपंगांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास महापालिका भवनासमोर आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी अपंग धारकांना स्टॉल संरक्षण मिळायला हवे असे विविध फलक हातात घेतले होते. अपंग कार्यकर्त्यांनी भारत माता की जय.. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही. अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सदस्य सहभागी झाले होते. .........अशा आहेत मागण्या....१) अपंग व्यक्तीसाठी स्वतंत्र कक्ष हवा. २) अपंगांना साहित्य खरेदीसाठी 50 हजार रुपये अनुदान द्यावे.३) तसेच अपंगांसाठी स्वावलंबन आरोग्य विमा योजना सुरू करावी.४) पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील अपंगांचे स्टॉल धारकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करावे.................