शिरगाव : पार्थ पवार कोण हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दाखवू, असे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष मु-हे यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी, ‘कोण पार्थ पवार?’ अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मुºहे म्हणाले की, राजकारणात येऊ पाहणाºया नवोदित तरुणांवर बारणेंसारख्या जाणत्या राजकारण्यांनी अशी टीका करणे योग्य नाही. माहिती नसतील, तर आम्ही येत्या निवडणुकीत दाखवून देऊ की पार्थ पवार कोण आहेत? बारणे त्यांच्या २५ वर्षांचा अनुभव आणि विकास याबद्दल बोलत असतील, अशा प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, असे म्हणावे लागेल. खासदार बारणे यांनी आपले विधान मागे घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.>ज्यांच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत, त्या पवार घराण्यातील एका सदस्यावर अशी टीका करणे योग्य वाटत नाही. बारणे यांना तर मुळीच नाही. आपला महाराष्ट्र हा एक प्रगल्भ आणि पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला राज्य आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असे संपूर्ण जगावर गारुड असलेले नेते दिले. त्या महाराष्ट्रात नव्याने राजकारणात येऊ पाहणाºयांना जर अशा प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, असे म्हणावे लागेल. खासदार बारणे यांनी आपले विधान मागे घ्यावे, असेही मुºहे यांनी सांगितले.
"पार्थ पवार कोण हे निवडणुकीत दाखवून देऊ"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 2:14 AM