कामशेत : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना येथील इंद्रायणी कॉलनीत घडली. या प्रकारणी कामशेत पोलीस ठाण्यात हिरामण बसप्पा कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रुपाली हिरामण कांबळे (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हिरामण बसप्पा कांबळे, रुपाली हिरामण कांबळे (वय ३५), दोन मुले कुणाल व कुशल (वय १० व ५ वर्ष) हे कुटुंब कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीत गणपती मंदिराच्या बाजूस रुपाली हिच्या भावाच्या मालकीच्या घरात राहण्यास होते. हिरामण कांबळे हा व्हीपीएस हायस्कूल लोणावळा येथे शिपाई पदावर नोकरीस होता. त्याला दारूचे व्यसन होते. यावरून दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण करीत असे. दारूसाठी पैसे मागत असे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास हिरामण कांबळे याने त्याची पत्नी रुपाली कांबळे हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तिने पैसे दिले नाही त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले याच रागातून हिरामणने पत्नी रुपालीच्या मानेवर डाव्याबाजूस धारधार हत्याराने मारून गंभीर जखमी केले. यात रुपाली मृत्युमुखी पडली असून हिरामण आपली कपड्याची बॅग भरून पळून गेला. या घटनेची माहिती मृत महिलेच्या मोठ्या मुलाने त्याचे मामा सचिन साळवे यांना दिली. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या खुनाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत आहेत.
दारूच्या पैशांसाठी कामशेतमध्ये पत्नीचा धारदार हत्याराने निर्घृण खून; आरोपी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:20 PM
दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना येथील इंद्रायणी कॉलनीत घडली.
ठळक मुद्देकामशेत पोलीस ठाण्यात हिरामण बसप्पा कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंदरूच्या नशेत तो आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण असे करीत