पिंपरी चिंचवड : कचरावेचकांना लॉकडाऊनच्या काळात झालेल्या आर्थिक त्रासाला व्यक्त करत संघटनेने गुरुवारी ( दि. १० ) आंदोलन पुकारले. 'कामगारांचे हक्क हे मानवी हक्क आहेत असे प्रतिपादन करण्याकरिता दारोदार कचरा गोळा करणारे कचरावेचक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण एकत्र आले होते.
या सभेतून कचरावेचकांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१६ सालच्या“फ्रीडम ऑफ असेम्ब्ली अँड असोसिएशन” या महत्वाच्या अहवालाची आठवण करून द्यावयाची होती. ज्यात ''कामगारांचे हक्क हे मानवी हक्क असून कामाच्या ठिकाणी हे हक्क बजावले गेले पाहिजे,'' असं सांगितले आहे. मग ते ''आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वा अन्य कोणतेही हक्क असो'' असे उद्धृत केले गेले आहे.
या सभेद्वारे आजच्या दिवसाचे पालन करतानाच तीनही कृषि-विरोधी कायद्यांचे उच्चाटन करण्याकरिता देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला व शेतकऱ्यांना देखील पाठिंबा जाहीर करण्यात आला.
........ आंदोलकांच्या मागण्या : १ - कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत नियुक्ती (ग्रामपंचायत वगळता)”याविषयी निघालेल्या अधिसूचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलन कामगारांना रोजगार द्यावा.२ - २४ फेब्रुवारी २०१५ पासूनची थकबाकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलन कामगारांना अदा करावी.३ - किमान वेतन दरानुसार देय असलेल्या थकबाकीच्या रकमांच्या बाबी लवकरात लवकर निकालात काढाव्या.४ - आनंद नगर येतील कचरावेचकांना ६५ दिवसांचा कोविड भत्ता लागू करावा कारण त्या कालावधीमध्ये त्यांना कामावर घेण्यात आले नव्हते.