रावेत : परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे. नागरीकरणाचा वाढता वेग आणि त्याचप्रमाणे परिसरात हळूहळू डोके वर काढणारी गुन्हेगारी याला आळा बसण्यासाठी रावेत परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी व्हावी, ही मागणी शहरात नव्याने आयुक्तालय झाल्याने जोर धरू लागली आहे. स्वतंत्र चौकीची आवश्यकता असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच येथील रहिवासी अजूनही असुरक्षिततेच्या छायेतच वावरत आहेत. आता पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र आयुक्तालय मिळाले आहे. त्यामुळे रावेतकरांचा हा प्रश्न कधी मार्गी लावणार, असा प्रश्न येथील रहिवासी करीत आहेत.
आजपर्यंत ग्रामीण आणि शहरी हद्दीच्या वादात रावेत परिसर होते; परंतु आता आयुक्तालयामुळे ग्रामीण भागातील देहूरोड पोलीस स्टेशन शहराला जोडल्याने आता हद्दीचा वाद थांबला आहे. रावेत परिसरात चोरीचा अथवा इतर गुन्हा घडला किंवा काही कारणास्तव पोलीस स्टेशनला काम पडले, तर नागरिकांना देहूरोडला जावे लागते. रावेत परिसरात एकही पोलीस चौकी नाही. त्यामुळे परिसरात पोलीस चौकी पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.
झपाट्याने नागरीकरण होणारा परिसरझपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा भाग म्हणून रावेत परिसर ओळखला जातो. चिंचवड, निगडी, हिंजवडी आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीवर असल्यामुळे नेमकी तक्रार कोठे द्यायची हा नागरिकांना नेहमी प्रश्न असतो. नामांकित शैक्षणिक संस्था, तसेच हिंजवडी आयटी पार्क जवळ असल्यामुळे व शांततेचा परिसर म्हणून रावेतमध्ये राहणाºयाची संख्या मोठी आहे. रावेत मुख्य चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते. लहान-मोठे अपघात हे ठरलेलेच. चौकीचा वापर व्यवसायासाठी
रावेतच्या मुख्य चौकात देहूरोडअंकित येथील लोकप्रतिनिधींच्या मदतीने काही वर्षांपूर्वी चौकी उभारण्यात आली होती. पण चौकी उभारली तेव्हापासून तिथे कधी अधिकारी तर सोडाच, हवालदार पण पहावयास मिळाला नाही. नंतर काही दिवसांनी एका रात्री ती चौकी गायब होऊन त्या ठिकाणी नवीन व्यवसायाचे दुकान सुरू झाले, असे नागरिक सांगतात. पोलीस अधिकाºयांकडून पाठपुराव्याची गरज४रावेत परिसरात अधूनमधून घडणारी गुन्हेगारी व अपघाताचे प्रमाण पाहता देहूरोड पोलीस चौकी खूप लांब आहे. त्यापेक्षा चिंचवड किंवा निगडी हे दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दी जवळ आहेत. शहरात नवीन आयुक्तालय स्थापन झाले आहे. रावेतची लोकसंख्या पाहता पोलीस चौकी होणे गरजेचे आहे. परिसरामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती हळूहळू फोफावत असून, अनेक असामाजिकघटना घडत आहेत. या सर्वांना जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. यावर उपाययोजना म्हणून पोलीस चौकी सुरूकरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.झपाट्याने वाढणाºया लोकसंख्येचा भाग म्हणून रावेत परिसर ओळखला जातो. चिंचवड, निगडी, हिंजवडी आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीवर असल्यामुळे नेमकी तक्रार कोठे द्यायची हा नागरिकांना नेहमी प्रश्न असतो. नामांकित शैक्षणिक संस्था, तसेच हिंजवडी आयटी पार्कजवळ असल्यामुळे व शांततेचा परिसर म्हणून रावेतमध्ये राहणाºयाची संख्या मोठी आहे. रावेत मुख्य चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते. लहान-मोठे अपघात हे ठरलेलेच. पण कुठल्याही चौकात वाहतूक पोलीस दृष्टीस पडत नाही. जवळच रावेतचे वैभव असणारा संत तुकाराम पूल आहे. यावर प्रेमी युगलांचा वावर खूप असतो. त्यांची वाहने रस्त्यावरच लावलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
रावेत व चिंचवडला जोडणारा रस्ता हा रस्ता रखडलेला आहे. या रस्त्यावर रात्री मद्यपी दारू पित असतात. दारू पिऊन झाल्यावर ते बाटल्या तिथेच फोडतात. त्यामुळे रस्त्यावर काचेचा सडा पडलेला असतो. यांच्यावर हद्दीच्या वादामुळे कायद्याचा कसलाही वचक नाही. त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा व रावेत चौकात पोलीस चौकी त्वरित सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.3स्थानिक लोकप्रतिनिधी परिसराचा कायापालट करण्यासाठी आणि विविध योजना परिसरात राबविण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र पोलीस चौकीबाबत त्यांच्याकडे उदासीनता का आहे, असा प्रश्न येथील नागरिकांकडूनउपस्थित करण्यात येत आहे. पोलीस चौकीची रावेत परिसराला अत्यंत आवश्यकता आहे. येथे पोलीस चौकी उभारण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.देहूरोड पोलीस ठाणे आतापर्यंत ग्रामीण हद्दीत होते. आता नवीन आयुक्तालय झाल्याने शहरी भागात समावेश झाला आहे. त्यामुळे केवळ रावेतच नाही तर हद्दीत आवश्यक असणाºया पाच ठिकाणी पोलीस चौकी निर्माण करण्याचे नियोजन आहे. ग्रामस्थांनी रीतसर उपलब्ध जागेचा प्रस्ताव पोलिसांकडे द्यावा. तत्काळ आयुक्तालयाकडे पाठपुरावा करून पोलीस चौकी उभारली जाईल.- प्रकाश धस, वरिष्ठ निरीक्षक,देहूरोड पोलीस ठाणेरावेतला पोलीस चौकी झाल्यावर चुकीच्या गोष्टीवर वचक राहण्यास मदत होईल. त्यासाठीच येथे पोलीस चौकी सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे.- गणेश शिवाजी भोंडवे, युवक, रावेतगेल्या अनेक वर्षांपासून येथे चौकी असावी, अशी मागणी आहे. ती का होत नाही याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. आयुक्तालय झाल्याने पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालायला हवे.- अक्षय रामदास भोंडवे, युवक, रावेतरावेतचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. चौकातील वाहतूककोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीसुद्धा आवश्यकता आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस चौकीची गरज आहे. - विनोद राठोड, नागरिक