पिंपरी : शहरात ऑगस्टमध्ये नव्याने पोलीस आयुक्तालय सुरू झाले. त्यानंतर काही दिवसांनी अमली पदार्थविरोधी पथक हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने तीन महिन्यांत विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे १ कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याचा साठा, विक्री व वाहतूक करणाऱ्या १६ जणांवर कारवाई केली. गुटख्याची वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. ४० लाखांचा गुटखा पकडण्याची सर्वांत मोठी कारवाई चिंचवडमध्ये झाली आहे.अमली पदार्थविरोधी पथक, तसेच अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने बेकायदा गुटखा विक्री करणाºयांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली आहे. पिंपरी, हिंजवडी, चिखली, वाकड, पिंपळे सौदागर, वाकड, चिंचवड, चिखली आदी भागांत संयुक्त कारवाई करून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, तसेच अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर गुटखा विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी वंदना विठ्ठल रुपनवर, अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी संतोष सावंत, सहायक आयुक्त आर. काकडे, रवींद्र जेकटे यांनीही मोलीची कामगिरी बजावली.हिंजवड, वाकड भागात विशेषत: मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत हिंजवडीत चार वेळा आणि वाकडमध्ये तीन वेळा कारवाई झाली आहे. चाकण, चिखली भागातही तीन वेळा गुटखा जप्तीची कारवाई झाली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन, तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ लाख ७१ हजार १३२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला, तर चिखली येथे २ लाख ३७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. पिंपळे सौदागर आणि संत तुकारामनगर येथील टपºयांमधील गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.वाकडला वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना संशयितरीत्या आढळलेल्या टेम्पोचा पाठलाग केला. या कारवाईत तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केला. अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत पिंपळे गुरव येथून एक लाख २६ हजार १७६ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संत तुकारामनगर येथे कारवाई करून १० लाख ४५ हजार ३६० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. तसेच या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (दि. ८) केलेल्या कारवाईत वाकड येथे ४ लाख ८७ हजार १२६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.अशी करण्यात आली कारवाईचिंचवड पहिली कारवाई ४३ हजार ७७ रुपयांचा गुटखाचिंचवड दुसरी कारवाई ४० लाख ९० हजारांचा गुटखाहिंजवडी पहिली कारवाई ७ लाख ८१ हजार १३२ रुपयांचा गुटखाहिंजवडी दुसरी कारवाई ११ लाख ७५ हजारांचा गुटखावाकड पहिली कारवाई १३ लाख ४८ हजारांचा गुटखावाकड दुसरी कारवाई १ लाख ९० हजारांचा गुटखावाकड तिसरी कारवाई ४ लाख ८७ हजार १२६ रुपयांचा गुटखापिंपळे सौदागर १ लाख २५ हजारांचा गुटखापिंपळे गुरव १ लाख २६ हजारांचा गुटखाचाकण पहिली कारवाई १६ लाख १६ हजारांचा गुटखाचाकण दुसरी कारवाई १० लाख रुपयांचा गुटखाचिखली २ लाख ३७ हजारांचा गुटखाचिंचवडला ४० लाख ९० हजारांचा गुटखा जप्तचिंचवड हद्दीत गुटखा घेऊन जाणारा टेम्पो अडवून पोलिसांनी सप्टेंबरमध्ये सुमारे ४० लाख ९० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर याच परिसरात झालेल्या कारवाईत ४३ हजारांचा गुटखा जप्त करण्यातआला होता.
तीन महिन्यांत तब्बल १ कोटी १३ लाखांचा गुटखा केला शहरातून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:55 AM