पिंपरी : रूग्णाच्या नातेवाईकांची पूर्वसंमती न घेता व गर्भपात केल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल याची माहिती न देता महिलेचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला असून पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसया राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुर्यकांत राठोड यांनी फिर्याद दाखल केली आहे. राठोड हे पत्नी अनुसया यांना घेवून पित्ताशयातील खड्यांवरील उपचारासाठी संत तुकारामनगर येथील खासगी रूग्णालयात गेले. तेथे वैद्यकीय तपासण्या केल्या असता त्या गर्भवती असल्याच्या निदर्शनास आले. इंजेक्शन देवून गर्भपात करणे शक्य आहे, असे सांगून पहिल्यांदा गर्भपात करून घेवू नंतर पित्ताशयाच्या खड्यावरील उपचार करू असे डॉक्टरांनी राठोड यांना सांगितले. परंतु, गर्भपातानंतर काही वेळाच महिलेचा मृत्यू झाला. रूग्णाच्या नातेवाईकांची संमती न घेता गर्भपात केला. चुकीच्या पद्धतीने उपचार केले असल्याने केसपेपरवर खाडाखोड करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मृत महिलेच्या पतीने पोलिसांकडे धाव घेतली. हलगर्जीपणाबद्दल डॉक्टरांविरूद्ध कारवाई करावी. अशी मागणी राठोड यांनी केली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
पिंपरीत गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू ; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:07 PM
रूग्णाच्या नातेवाईकांची पूर्वसंमती न घेता व गर्भपात केल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल याची माहिती न देता महिलेचा गर्भपात करण्यात आला.
ठळक मुद्देआकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी चौकशी केली जाणार