शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महिला जागेसाठी होणार चुरस

By admin | Published: October 16, 2016 4:03 AM

दिघी आणि बोपखेल दोन गावांचा मिळून प्रभाग क्रमांक चार झाला आहे. त्यात नव्याने समाविष्ट झालेल्या गांवाचा परिसर या प्रभागात आहे. चोहूबाजूने असणाऱ्या लष्करी

पिंपरी : दिघी आणि बोपखेल दोन गावांचा मिळून प्रभाग क्रमांक चार झाला आहे. त्यात नव्याने समाविष्ट झालेल्या गांवाचा परिसर या प्रभागात आहे. चोहूबाजूने असणाऱ्या लष्करी प्रकल्पांचा वेढा यामुळे येथील विकासावर नियंत्रण आले आहेत. सामान्य आणि मध्यमवर्गीयांची संख्या या प्रभागात अधिक आहे. त्यामुळे हे मतदार निर्णायक असणार आहेत. या प्रभागात दोन जागा अनुसूचित जाती, जमाती आणि उर्वरित दोनपैकी एक जागा ओबीसी महिला, सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. खुल्या गटातील पुरुषांना लढण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे महिलांच्या गटात उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३१ दिघी गावठाण आणि प्रभाग ६४ दापोडी-बोपखेल अशा दोन प्रभागांचा समावेश यंदाच्या चार क्रमांकाच्या प्रभागात झाला आहे. दोन भागात हा प्रभाग विभागलेला आहे. नदीपात्र, रस्ते अशा नैसर्गिक गोष्टीच्या निवडणूक आयोगाच्या निकषाचे पालन केलेले दिसत नाही. मनमानी पद्धतीने प्रभाग फोडला आहे. बोपखेल हा प्रभाग गेल्या वेळी दापोडी परिसराला जोडला गेला होता. तर दिघीचा काही परिसर भोसरी परिसराला जोडला गेला होता. बोपखेलचा परिसर आता दिघीला जोडला आहे. सीएमईच्या हद्दीने मुळानदीने कैलास बाऊन्ड्री, पुढे बोपखेल गाव लष्कराच्या हद्दीपर्यंत असा एक भाग तयार केला आहे. दुसऱ्या भागात आळंदी रस्त्याकडील लष्कराच्या हद्दीने गणेशनगर, समर्थनगर, हॉटेल मराठा दरबार, दिघी मॅगझिन चौक, पुढे भोसरी-आळंदी रस्त्याने दिघी गावच्या हद्दीने पांडुरंग रोकडे यांची मिळकत, पंचशील बुद्धविहार, कृष्णानगरपर्यंत आणि पुढे हा भाग लष्कराच्या हद्दीपर्यंत असणाऱ्या दिघी गावठाणास जोडला आहे. जुन्या दोन प्रभागांची मोडतोड करून हा प्रभाग तयार केला आहे. गत निवडणुकीत दिघी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा सुपे, चंद्रकांत वाळके, दापोडी बोपखेल प्रभागातून आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय उर्फ नाना काटे निवडून आले होते. सोनकांबळे यांचा अर्धा भाग दुसऱ्या प्रभागास जोडला गेला आहे. त्यामुळे त्या कोणत्या प्रभागातून उभ्या राहतात, याबाबत उत्सुकता आहे. उपलब्ध आरक्षणानुसार विद्यमान नगरसेवक चंद्रकांत वाळके आणि संजय काटे यांना या प्रभागातून निवडणूक लढविता येणार नाही. काटे आणि वाळके या दोघांनाही आपल्या पत्नीस निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. त्यामुळे ओबीसी आणि सर्वसाधारण गटांतील महिला उमेदवारांमध्ये चुरस असणार आहे. सुपे यांना हा प्रभाग सेफ झाला आहे. सर्वसाधारण कामगार कष्टकरी वर्गाची संख्या अधिक असल्याने त्यांचे मत निर्णायक ठरणार आहे. या दोन्ही गावांच्या आजूबाजूंनी लष्कर असल्याने विकासावर नियंत्रण आलेले आहे. बहुतांश आरक्षणे प्रतीक्षेत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीला तीन आणि आरपीआयला एक जागा मिळाली होती. (प्रतिनिधी)