शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

संपामुळे कामकाज ठप्प

By admin | Published: November 18, 2016 4:42 AM

तालुक्यात ग्रामसेवक आणि तलाठी आणि पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. तलाठी दफ्तरी असणारी

वडगाव मावळ : तालुक्यात ग्रामसेवक आणि तलाठी आणि पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. तलाठी दफ्तरी असणारी शेतकऱ्यांची कामे स्थगित झाली आहेत. या आंदोलनाची झळ सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून, विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने सर्व त्रस्त झाले आहेत.आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे ग्रामसेवकांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ग्रामसेवकांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या आणि कार्यालयीन शिक्के गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्याकडे जमा केल्या आहेत. या वेळी मावळ तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बी. आर. मतकर, सचिव के. पी. खेसे, उपाध्यक्ष एस . डी. नाईककडे, संघटक डी. एस. शिरसाट, पी. पी. घोडेकर, आर. बी. देशमुख , के. उळागडे, के. डी. लोखंडे व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्ष सेवाकाल नियमित करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना प्रवास भत्ता म्हणून तीन हजार रुपये दरमहा पगाराबरोबर मिळावेत, ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अर्हता पदवीधर असावी, सन २०११च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्मिती करावी, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी व ग्रामसभा, सचिव बदल होणे व ग्रामसभेत सुधारणा होणे, तसेच नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा असावी, ग्रामसेवक संवर्गाकरता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करावे अशा मागण्या आहेत.१२ जून २०१३चे विनाचौकशी, फौजदारी केसेस परिपत्रक मागे घ्यावे, २० ग्रामपंचायतीकरिता विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, समाजकल्याण विस्तार अधिकारी पदे भरावीत , केंद्र पुरस्कृत विस्तार अधिकारीपद निर्मिती करावे, सन २००५नंतर सेवेत असणाऱ्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी , ग्रामसेवक संवर्गाचा सुधारित जॉब चार्ट तयार करावा, राज्यभर होणारे ग्रामसेवकावरील हल्ले, मारहाण, खोट्या केसेस याबाबत सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण गुन्हा अजामीनपात्र करणेस्तव निर्णय घेणे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवक काम बंद आंदोलन करत आहेत. आंदोलनामुळे नागरिकांना विविध दाखले, उतारे व इतर शासकीय कागदपत्रे मिळण्यासाठी गैरसोय होत आहे. यास पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असून, वेळेत मागण्या मान्य न केल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे मावळ तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्ष बी. आर. मतकर यांनी सांगितले. (वार्ताहर)