पिंपरी : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. कामगार वर्ग मोठ्या अपेक्षेने या अर्थसंकल्पाकडे पाहत होता. मात्र, कामगारांच्या पदरी निराशा पडली आहे. कामगारांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले, अशा प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या प्रतिनिधींकडून उमटल्या. पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी अशीही ओळख आहे. शहरात अनेक छोटे-मोठे उद्योग असून हजारो कामगार करतात. येथील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. शहर व राज्याच्या विकासात उद्योग व कामगारांचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, कामगारांनाही शासनाकडून सुविधा मिळणे गरजेचे आहे. शनिवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, कामगारांनी अर्थसंकल्पाबाबत निराशा व्यक्त केली. (प्रतिनिधी)
कामगारांच्या पदरी निराशा
By admin | Published: March 21, 2017 5:13 AM