शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘डान्सिंग डायमंड’ची लखलखती दुनिया ‘इंट्रिया’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 3:31 AM

महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि चमचमत्या तेजाने डोळे दीपवणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ‘डान्सिंग डायमंड’ ही आगळीवेगळी संकल्पना ‘इंट्रिया’ प्रदर्शनात शनिवारी सादर झाली.

पुणे : महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि चमचमत्या तेजाने डोळे दीपवणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ‘डान्सिंग डायमंड’ ही आगळीवेगळी संकल्पना ‘इंट्रिया’ प्रदर्शनात शनिवारी सादर झाली. हिऱ्याच्या लखलखत्या चंदेरी दुनियेत प्रवेश केल्यानंतर सृजनशील, कलात्मक दागिन्यांचा एक अनोखा नजराणा उपस्थितांसमोर पेश झाला अन् दागिन्यांच्या मोहक कलाकुसरीने सर्वांनाच भुरळ घातली.संस्कृती आणि परंपरेचा मेळ घालत प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या संकल्पीय कौशल्यातून साकार झालेल्या हिºयांच्या नवनवीन डिझाईन्सच्या दागिन्यांच्या ‘इंट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी झाले. या वेळी डी. वाय़ पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी़ पाटील, भाग्यश्री पाटील, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, यूएसके फाउंडेशनच्या उषा काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या स्वनिल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची भेट हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. उद्या (रविवारी) सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्लू मेरीयट हॉटेल येथे सकाळी ११ ते ८ या कालावधीत पाहाता येणार आहे.हिºयाचे दागिने हा महिलांचा अत्यंत विकपॉइंट. महिलांची हीच आवड लक्षात घेत पारंपरिक आणि आधुनिक नक्षीकामाच्या अप्रतिम गुंफणीतून हिºयाच्या दागिन्यांचे कलेक्शन ‘इंट्रिया’ मध्ये साकार झाले. बारीक हिºयांचे काम, नाजूकपणा आणि त्यातही जपलेला साधेपणा या गोष्टींमुळे कलेक्शनला सर्वांची पसंती मिळाली. फुलांचे सौंदर्यही दागिन्यांना अधिक खुलवत आहे.रूबी, एमराल्ड, सफायर, डायमंड असे विविध स्टोनच्या डिझाईनर दागिन्यांची मालिकाही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आज ‘इंट्रिया’ चे नाव आघाडीच्या ज्वेलरी डिझाईन हाऊसमध्ये घेण्यात येते. ग्राहकांना तांत्रिकतेने परिपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तराचे दर्जेदार डिझाईन्स उपलब्ध करून देण्यासाठी हे दागिने एकमेवाद्वितीय असून, परिधान करण्यासदेखील सोपे आहेत. प्रत्येक दागिने तयार करताना आधुनिकतेसोबतच पारंपरिक आणि समकालीन भारतीय डिझाईन्सवरदेखील भर देण्यात आला आहे.नेहमीप्रमाणे वेगळी दागिन्यांची डिझाईन्स पाहायला मिळाली आहेत. सृजनात्मक कौशल्यातून दागिने साकार झाले आहेत. यामध्ये इअररिंग्स आणि रिंग्सचे कलेक्शन विशेष भावले.- उषा काकडेप्रदर्शनातील आकर्षक डिझाईंन्सच्या दागिन्यांनी भुरळ घातली. संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम दागिन्यातून घडला.- रितू छाब्रियाही ‘डान्सिंग डायमंड’ ही संकल्पना खूप आवडली. इअररिंग्स घातल्यानंतर ज्याप्रकारे ट्विस्ट होतात आणि थ्री डी इफेक्ट पाहायला मिळतो...इट इज रिअली अमेझिंग.- मुक्ता बर्वे,दागिने खूप आर्टिस्टिकली केले आहेत हे जाणवते. या प्रदर्शनातील दागिने परिधान केल्यानंतर एकप्रकारचे समाधान आणि आत्मिक आनंद मिळतो. - भाग्यश्री पाटीलप्रदर्शनाला भेट देऊन खूप छान वाटले. हि-याचा मोह प्रत्येक महिलेला असतो. यातील सर्वच दागिने मनाला भुरळ पाडणारे आहेत. - अर्चना संचेती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड