शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

महाकालीची नृत्यातून आराधना

By admin | Published: July 17, 2017 4:05 AM

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते-शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते-शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो तिच्या विविध रूपातून तिच्या अलौकिक शक्तीचे दर्शन भक्तांना घडत असते. मग हा भक्त आपल्या भक्तीद्वारे तिला प्रसन्न करीत असतो. मग ती पूजा, अर्चना, आरती असो की नृत्य, भजन, गोंधळ असो. म्हणूनच कलेची उपासना ज्या देवीला आवडते तिच्या स्वरूपात आपल्या भक्तांसाठी महाकालीचे मंच म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्याच्या स्वरूपात देवीच्या आराधनेतून सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम आध्यात्मीक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम ठरणार आहे; हे निश्चित. दि. १८ जुलै रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा कार्यक्रम दु. १२ वा आयोजित केला आहे. यात एकलनृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धा सर्व लोकमत वाचकांसाठी खुली असून १० वर्षाच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. नृत्य ज्या गीतावर आधारित आहे त्याचा कालावधी ५ मिनिट असून त्यात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. ज्यात हुंडाबळी, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, स्त्री अत्याचार इ. समावेश असावा. प्राथमिक फेरी दि. १८ जुलै रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सकाळी १० वा घेण्यात येणार आहे.महाकालीचे महामंच याद्वारे कलाकारांना घडविणार आहे. असे म्हणतात शिव हा शक्तीशिवाय शव आहे. शक्तीची देवता महाकाली शिवाय शिव अपूर्ण आहे. आपल्या अक्राळ विक्राळ शक्तीने महाकाली ओळखल्या जातात. पण संहारक म्हणून महाकाली पुज्य आहे. अशा या महाकालीचे दर्शन तिची महिमा सांगणारी कलर्सची येणारी मालिका म्हणजे महाकाली, अंत ही आरंभ है. ही मालिका २२ जुलै रोजी प्रसारित होणार असून प्रत्येक शनिवार व रविवारी संध्या. ७ वा. कलर्स चॅनलवर बघायला विसरू नका. या मालिकेद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न कलर्स चॅनलद्वारे देण्यात आले आहे. स्त्री ही वात्सल्यमूर्ती आहे पण प्रसंगी ती महाकालीचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करते. स्वामीनी रणचंडीका होऊन संहारक बनते तेव्हा तिच्यातील शक्तीचा बोध घेणे हा मालिकेचा उद्देश असून नृत्य स्पर्धेतून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व वाचकवर्ग कार्यक्रम बघण्याकरिता सादर आमंत्रित आहे. स्पर्धा देखील नि:शुल्क असून स्पर्धेची नोंदणी दि. १६ व १७ रोजी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत लोकमत कार्यालयात येऊन करावी लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क- ०२०-६७३४५६७८ यावर संपर्क साधावा.