तेजस टवलारकर- पिंपरी : मार्च ते सप्टेंबर या सात महिन्यांच्या कोरोनाच्या काळात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात १३२९ महिलांची प्रसूती झाली आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत १०७४ संशयित महिलांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यातील २५५ महिलांना कोरोनाची लागण झाली होती. या २५५ महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. प्रसूती झालेल्या महिलांपैकी ३० टक्के महिलांची प्रसूती सिझरने झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात वायसीएम रुग्णालय गर्भवती महिलांना वरदान ठरले आहे. वायसीएम मध्ये जन्मलेल्या नवजात बाळांपैकी दोन बाळांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा संसर्ग सरू झाल्यापासून वायसीएम रुग्णालय हे कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु याही परिस्थितीत गर्भवती महिलांना वायसीएम रुग्णालयाचा आधार मिळाला आहे. मार्च महिन्यात वायसीएम रुग्णालयामध्ये ७५० महिलांची महिलांची प्रसूती झाली. परंतु मार्च महिन्यात एकही महिलेला कोरोनाची लागण झाली नाही. मे महिन्यात एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. या महिन्यात ५० महिलांची प्रसूती झाली. त्यातील ४९ महिलांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात १३३ महिलांची प्रसूती झाली. त्यातील सात महिलांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. प्रत्यक्षात १२६ महिलांना कोरोनाची लागण झाली. सप्टेंबर महिन्यात १७३ महिलांची प्रसूती झाली त्यातील ८५ महिलांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. त्यातील ८८ महिलांना कोरोनाची लागण झाली. या सर्व महिलांची सुखरुप प्रसूती झाली, असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.-- कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात २५५ महिलांना कोरोनाची लागण झाली होती. सर्व महिलांवर योग्य उपचार करण्यात आले. वायसीएमच्या प्रसूती विभागाच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने चांगले काम झाले. कोरोनाच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून उपचार करण्यात आले. ३० टक्के महिलांचे सिझर करण्यात आले आहे. डॉ. महेश असाळकर, प्रसूती विभाग वायसीएम--- मार्च ते सप्टेंबर या सात महिन्यांची आकडेवारी मार्च प्रसूती संशयित पॉझिटिव्ह ७५० ७५० ० एप्रिल ९४ ९४ ० मे ५० ४९ १ जून ४६ ३५ ११ जुलै ८३ ५४ २९ ऑगस्ट १३३ ७ १२६ सप्टेंबर १७३ ८५ ८८
कोरोना काळात 'वायसीएम' ठरले गर्भवतींसाठी वरदान! २५५ कोरोनाग्रस्त महिलांची यशस्वी प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 1:05 PM