पिंपरी : महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सुरु होणाºया पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची एकूण ५३ पदे तीन वर्षे कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. ही भरती होणार असल्याने पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रूग्णालयात औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, पूर्णवेळ व नियमित डॉक्टरांची सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची अडचण होते. या ठिकाणी पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला. त्यासाठी आवश्यक असणाºया कागदपत्रांचीही पूर्तताही त्यांनी केली. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीकरण, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी व संलग्नीकरण, राज्य सरकारकडून अध्यापक वर्गासाठीची पदमंजुरी व पात्रता प्रमाणपत्र, डीएमईआर अर्थात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची परवानगी आदींकडून त्यांनी परवानग्या मिळविल्या.डॉ. परदेशी यांची अकाली बदली झाल्याने मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावावर धूळ साचली. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीचे सवलत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे पिंपरी महापालिकेचे मेडिकल कॉलेज कार्यान्वित होऊ शकले नाही. केंद्र सरकारच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉ. परदेशी यांना या बाबी कळताच त्यांनी दिल्लीतून सूत्रे हलविली. महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि नाशिकच्या एमयूएचएसचे कुलगुरू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पाठपुरावा केला. त्यानंतर वायसीएम रुग्णालयात सुरु होणारा अभ्यासक्रम एमयुएचएस-पीसीएमसी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट या नावाने कार्यान्वित करण्याचे ठरले. यासंदर्भातील मान्यतेचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारमार्फत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यानुसार याबाबतची तपासणी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या वेळी आवश्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, तसेच सहायक प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.सर्वसाधारण सभेतही होणार चर्चानवीन अभ्यासक्रमासाठी १० प्राध्यापक, १६ सहयोगी प्राध्यापक तसेच २७ सहायक प्राध्यापक अशी ५३ पदे भरण्यात येणार आहेत. सहायक प्राध्यापकाला पाच वर्षांपर्यंतचा अनुभव असल्यास ६० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे, तर पाच वर्षांपेक्षा जादा अनुभव असल्यास ७० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. तर सहयोगी प्राध्यापकांना ९० हजार रुपये आणि प्राध्यापकांना एक लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव १५ सप्टेंबरला होणाºया विधी समिती सभेसमोर ठेवला आहे.
वायसीएममध्ये वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्राध्यापकांची ५३ पदे भरणार, विधी समितीसमोर प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 3:09 AM