पिंपरी : संगणक अभियंता असलेल्या चिंचवडच्या चैतन्य चोरडिया या तरुणाने बोली संवाद तेवढ्याच जलदगतीने संगणकावर टाइप करणारी संगणक प्रणाली विकसित केली आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत संवादानुसार तोंडातून जसे शब्द बाहेर पडतील, त्याप्रमाणे संगणकाच्या स्क्रीनवर शब्द टाइप होत जाणारे हे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरणारे असून, चैतन्यने या संगणक प्रणालीसाठी (बौद्धिक संपदा कायद्यानुसार) कॉपीराईट मिळविले आहेत. हाताचा, बोटांचा उपयोग न करता संगणकाच्या की बोर्डशिवाय या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून टायपिंग करणे सहज शक्य होणार आहे.वाहतूक व्यवस्थापनावर संशोधनआयटी इंडस्ट्रीमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला. परंतु अलीकडच्या काळात आयटीतील रोजगाराची शाश्वती उरली नाही. आयटी क्षेत्रात परदेशी कंपन्यांची कामे घेतली जातात. सर्व्हिस सेक्टर असे आयटी इंडस्ट्रीचे स्वरूप आहे. येथील कंपन्या इतर देशांकडून मिळणाºया कामावर अवलंबून आहेत. नवे संशोधन होणे काळाची गरज आहे. आयटी क्षेत्रात संशोधनाचे काम झाल्यास या क्षेत्रातील रोजगार शाश्वत होऊ शकतो, हे लक्षात घेऊन संशोधनाकडे वळालो. आगामी काळात त्यावर संशोधन करण्याचा मनोदय आहे, असे चोरडिया यांनी सांगितले.लिंगोसेव्ही हा शब्द स्पॅनिश असून, त्याचा अर्थ बोली जाणकार असा आहे. शासकीय कार्यालये व खासगी संस्था आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टायपिंगचे काम चालते. की बोर्डवर हाताने माहिती टाइप करण्यास वेळ लागतो. हा वेळ वाचविणे शक्य व्हावे, तसेच इंग्लिश भाषा शिकण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी सलग दोन वर्षे संशोधन केले. नवीन काही तरी करावे या उद्देशाने मनात आलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे, असे चैतन्य चोरडिया म्हणाले.
तुम्ही बोलत राहा, होईल टायपिंग, लिंगोसेव्ही अप्लिकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:49 AM