वडगाव मावळ : तरुणाईने जातीपातीच्या राजकारणात एकमेकांचे शत्रू होण्यापेक्षा एक चांगला माणूस होऊन समाजातील अपंग, पीडित, गरीब कष्टकरी यांची सेवा करावी, त्यातून तुम्हाला समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, असे मत अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वडगाव मावळ येथे बोलताना व्यक्त केले.२०१३मध्ये देहू येथील एका आंदोलनादरम्यान आमदार बच्चू कडू यांच्यावर एक गुन्हा नोंदविण्यात आला होता, त्या केसच्या तारखेसाठी ते मावळ न्यायालयात आले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, की मी जात, धर्म न पाहता केवळ माणूस पाहून काम करतो, ज्याला गरज आहे असे कोणीही माणूस असो त्याचे काम करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. समजातील सर्वांनी असा दृष्टीकोन ठेवला तर समाजात आपोआप शांतता नांदू लागेल.यावेळी शिक्षक संघाच्या नेत्या शोभा वहिले, अध्यक्ष नारायण कांबळे, विलास थोरात, अण्णासाहेब ओहोळ, चिमाजी वाळुंज, प्रमोद भोईर, राहुल लंबाते, गंगासेन वाघमारे, नितीन वाघमारे, दत्ता भालेराव, रामेश्वर पवार, प्रवीण भवाळ, विकास रासकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जगदीश ओहोळ यांनी केले होते.
जातीपातीच्या राजकारणापेक्षा तरुणांनी समाजसेवेकडे लक्ष द्यावे : बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 7:04 PM
तरुणाईने जातीपातीच्या राजकारणात एकमेकांचे शत्रू होण्यापेक्षा पीडित, गरीब कष्टकरी यांची सेवा करावी, त्यातून तुम्हाला समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, असे मत अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वडगाव मावळ येथे बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देकोणीही माणूस असो त्याचे काम करणे हे मी माझे कर्तव्य समजतो : बच्चू कडू'जात, धर्म न पाहता केवळ माणूस पाहून काम करतो'