शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

लोणावळ्यात रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; तरुण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 1:18 PM

खंडाळा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत ही दुर्घटना घडली..

लोणावळा : खंडाळा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डाऊन मार्गावर ही घटना घडली आहे. सदर घटना ही आत्महत्या की अपघात याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसून, रेल्वे पोलिस याबाबत तपास करीत आहे.      हर्षदा संजय रोकडे  (वय-१९, रा. हांगेवावाडी, संगमनेर, अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे  नाव असून, चैतन्य मोहन सुखदेवे (वय-१९, रा. अमरावती) हा गंभीर जखमी झाला आहे.       मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणावळा लोहमार्ग पोलिसांना फोन आला की खंडाळ्यातील महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळ साठे मिसळच्या मागे रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू तर एक तरूण जखमी झाला आहे. माहिती समजताच लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोहमार्गावरील तरूणीचा मृतदेह बाहेर काढून, जखमी तरुणाला उपचारासाठी तत्काळ पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.  हे दोघे अपघाताच्या ठिकाणी कधी व कशासाठी आले होते याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झाली नसून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा लोहमार्ग पोलिस करीत आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू