शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मतदारसंघात १० अंडर ग्रॅज्युएट, तर ११ उमेदवार पदवीधर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:52 IST

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

मनोहर कुंभेजकरमुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. प्रामुख्याने झोपडपट्टी, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू व गर्भश्रीमंत विभागाचा समावेश होतोच, तर जुहू, वर्सोवा, लोखंडवाला या भागात बॉलीवूड व सेलिब्रेटी या मतदार संघाचे मतदार आहेत.या मतदार संघात एकूण २१ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक कला शाखेचे बीए पदवी प्राप्त केलेले सर्वात जास्त ४ उमेदवार आहेत. बीए करून कायद्याची पदवी घेतलेले २ उमेदवार, बीकॉम करून कायद्याची पदवी घेतलेला १ उमेदवार, बीएससी करून कायद्याची पदवी घेतलेला १ उमेदवार असून, एका उमेदवाराने सीएची पदवी घेतली आहे. ८वी उत्तीर्ण १ उमेदवार, ९ वी उत्तीर्ण ४ उमेदवार, १० वी उत्तीर्ण १ उमेदवार, तर १ महिला उमेदवार अशिक्षित आहे. येथील परिसराचा विचार करता, मुळातच हा मतदार संघ किंचितसा पांढरपेशा असल्याने त्यांचे प्रतिबिंब उमेदवारांच्या शिक्षणातून उमटत असल्याचे चित्र आहे.

>सुशिक्षित असल्याने किंचितसा दिलासाविद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी १९७० साली माटुंग्याच्या डी.जी.रूपारेल कॉलेजमधून अर्थशास्त्रामधून बीएमधून पदवी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी १९८४ साली पाटना येथून बीएमधून पदवी घेतली. समाजवादी पार्टीचे उमेदवार सुभाष पासी यांचे शिक्षण १२वी असून, ते उत्तर प्रदेशच्या लखनऊ विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत, तर ३ उमेदवार हे अल्पसंख्यांक आहेत. एकंदर हे उमेदवार सुशिक्षित असल्याने येथे मतदारांना किंचित दिलासा आहे.
>मतदारसंघात कला आणि विधि शाखेचे उमेदवार सर्वाधिकउत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचा विचार करता, येथे कला आणि विधि शाखेचे उमेदवार अधिक आहेत. त्या खालोखाल इतर अभ्यासक्रमांचे उमेदवार असून, सात उमेदवार हे इतर विभागातील असल्याचे निदर्शनास येते.<मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. देशाची वाटचाल जागतिक महासत्तेकडे होत आहे. उमेदवार हा शिक्षित, अनुभवी, उत्तम वक्ता त्यांच्या भागाची जाण असलेला, समस्या सोडविणारा आणि देश पातळीवरील समस्या पोटतिडकीने मांडणारा हवा.- सुजाता तावडे,लाईफ स्टाईल ब्लॉगरशिक्षणाला महत्त्व आहे. त्यामुळे उमेदवार किमान पदवीधर असावा. उमेदवार हा अनुभवी हवा. समाजकारण, राजकारण, मतदार संघातील समस्यांची चांगली जाण असली पाहिजे. तो उत्तम वक्ता असला पाहिजे. वाचन व्यासंगी हवे. मतदार संघाच्या समस्या प्रभावीपणे मांडता येतील.- नंदिनी परब, गृहिणी

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरmumbai-north-west-pcमुंबई उत्तर पश्चिम