कोलकाता: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता तृणमूलनं भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीपश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं. भाजपच्या या राजकारणाला तृणमूलनं त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील, असा दावा तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला.
"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 7:34 PM